मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात भारतरत्न डॉ. विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरगूडमधील प्रसिद्ध अभियंते पी . जी .चौगले होते.
प्रारंभी संघाचे, संचालक महादेव वागवेकर यानी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष पी., जी. चौगले व अन्य मान्यवर अभियंता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष पी जी चौगले यांच्या हस्ते पुष्पहार घालुन केले .व उपस्थितानी डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
प्रास्ताविकात संचालक जयवंत हावळ यांनी संघाच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन डॉ. विश्वेश्वरय्या यांचे मौलिक कार्य विषद केले. त्यानंतर उपस्थित अभियंत्यांना गुलाबपुष्प देवून व पेढा भरवून यथोचित सत्कार संघाचे पदाधिकारी व संचालक यांनी केला . या प्रसंगी अभियंता सदाशिव एकल, सागर भोसले, सौ. दीपा पाटील, प्रविण दाभोळे, संभाजी आगंज यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात अभियंता संभाजी आंगज यानी संघाचे उत्कृष्ट कार्य पाहून संघास आंगज परिवारातर्फे ५००० रू. ची देणगी देऊन मौलिक सहकार्य केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. जी. चौगले यांनी डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन त्यांनी देशाच्या अभियांत्रीकी क्षेत्रात अत्यंत मोलाची प्रेरणादायी कामगिरी बजावल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमास मुरगूड मधील अभियंते बाळासाहेब सुर्यवंशी , श्रीपतराव खराडे , संतोष भोसले, विशाल सुर्यर्वशी , सौ. अनुश्री हावळ , संदेश शेणवी , मयूर आंगज, सुधीर गुजर ,आकाश दरेकर, आकाश आमते , विक्रमसिंह घाटगे, विशाल रामसे , ओंकार खराडे, संतोष पाटील, हर्षद आसवले, शुभम भोसले , राजाराम गोधडे , प्रभू घूंगरे पाटील आदि अभियंते तसेच संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे, उपाध्यक्ष पी. डी. मगदूम, सचिव सरखाराम सावर्डेकर , खजानिस शिवाजी सातवेकर अन्य संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक रणजीतसिंह सासने यानी सर्वाचे आभार मानले .