संस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
मुरगूड(शशी दरेकर) : येथील सुवर्ण महोत्सवी पत संस्था, श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पत संस्था या संस्थेला अहवाल सालात १ कोटी ९७ लाख ९० हजार रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे सभापती अनंत फर्नांडीस यांनी दिली. संस्थेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. ते म्हणाले संस्थेने १५% लाभांश दिला आहे. संस्थेने केलेल्या दैदिप्यमान अर्थिक प्रगती मध्ये संस्थेचे सन्माननीय व्यवस्था पकीय मंडळ, सभासद बंधू भगिनी, अधिकारी आणि सेवकवृंद या साऱ्यांचे योगदान लाख मोलाचे आहे.
सभेच्या सुखातीला संस्थेचे जनरल मॅनेजर नवनाथ डवरी यांनी अहवाल सालात देवाज्ञा झालेल्याना श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर ज्येष्ठ संस्थापक संचालक जवाहर शहा यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या कार्याचा इत्यंभूत आढावा घेतला. ते म्हणाले संस्थेने ३६७ कोटी २४ लाखांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. संस्थेकडे ६३ कोटी ७० लाखांच्या ठेवी आहेत. योग्य तारणावर ४६ कोटी ४४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये २६ कोटी ६३ लाखांचे सोनेतारण कर्ज वाटप केले आहे. थकबाकी ०% तर एन पी ए ० % आहे. अहवाल सालात ऑडीट वर्ग ” अ ” आहे. तसेच अहवाल सालापासून सभासदांच्या हिताच्या दृष्टिनी संस्था महोत्सव निधीसाठी नफा विभागून ४१ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
जनरल मॅनेजर नवनाथ डवरी यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. विषय निहाय सांगोपांग चर्चा होऊन नियामक मंडळ रद्द करणेच्या ठरावासह सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत दिपक घोरपडे, विनायक हावळ, संजय रामचंद्र मगदूम, सुदर्शन हुंडेकरी, मारुती नलवडे, नामदेव शिंदे, हरी वंदूरे, दिलीप शिंदे आप्पासो पाटील, विलास गुरव आदीनी भाग घेतला .
दहावी व बारावी परीक्षेत गुणवता प्राप्त पाल्याचे नातेवाईकांच्या हस्ते दीप प्रज्वलन व लक्ष्मी-नारायण प्रतिमेचे पूजन करण्यात आले . मार्च २०२१ मधील गुणवता धारकांना माजी चेअरमन व व्हाईस चेअरमन अनुक्रमे श्री पुंडलीक डाफळे व रविंद्र खराडे तर मार्च २०२२ मधील गुणवता धारक विद्यार्थ्यांना चेअरमन व व्हाईस चेअरमन अनुक्रमे सर्वश्री अनंत फर्नांडीस व विनय पोतदार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच १० वी व १२ वी मध्ये प्रथम क्रमांकासाठी कै. शंकर गणपती शिरगावकर यांच्या स्मरणार्थ श्री दतात्रय शिरगांवकर यांच्या कडून प्रत्येकी रोख रुपये ५००/- देवून गौरविण्यात आले. संस्था सभासद संजय जयसिंगराव चौगले यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे दि ओरिएंन्टल इश्योरन्स कंपनी कडून मिळालेला रुपये १ लाखाचा धनादेश संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालकांच्या हस्ते पश्चात वारस निलांबरी चौगले यांना सुपूर्द करण्यात आला.
सभेस संस्थापक संचालक जवाहर शहा दतात्रय तांबट , पुंडलीक डाफळे ,रविंद खराडे, किशोर पोतदार, सुनिता शिंदे, सुजाता सुतार,चंद्रकांत माळवदे, रविंद्र सणगर, दतात्रय कांबळे, तज्ञ संचालक जगदीश देशपांडे , भारती कामत यांच्यासह कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी सचिव मारुती सणगर, मुख्यशाखा मुरगूड च्या शाखाधिकारी मनिषा सुर्यवंशी, राजेंद्र भोसले शाखा कापशी, रामदास शिऊडकर शाखा कूर, अनिल सणगर शाखा सावर्डे बुद्रुक, के. डी. पाटील शाखा सरवडे, अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे ,सर्व अधिकारी सेवक आणि मोठ्या संखेने सभासद हजर होते. व्हाईस चेअरमन विनय पोतदार यांनी आभार मानले .