
लिंगनूर दुमाला (ता. कागल) : लम्पी त्वचारोग आजाराचा जनावरांत प्रादुर्भाव वाढत आहे. गोकुळ दूध संघा तर्फे ही प्रतिबंधक लस मोफत देण्याचे जाहीर केले. याची सुरुवात कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथून संघाचे संचालक श्री.नविद मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते झाले.
पशुधन वाचवण्यासाठी गोकुळ संघातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन मोफत लस उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. लस उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे श्री. नविद मुश्रीफ साहेबांचा आभार व्यक्त केले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर, डॉ. डी. ए. पाटील, प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.