बातमी

दलितांना शूद्र बनविणाऱ्या सनातनी शक्तींची डॉ. बाबासाहेबांना जाणीव आणि चीड होती

कागलमधील वड्डवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन

कागल, दि. १६:
सनातनी शक्तीनी दलितांना शुद्ध बनवले होते, याची जाणीव आणि चीड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. त्या जाणिवेतूनच त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र दिला.

उसनं अवसान आणून जातीय विषवल्ली पेरणार्याना थारा देऊ नका. आपल्यासाठी झटणाऱ्याला आधार द्या, असेही ते पुढे म्हणाले.

कागलमध्ये वडवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन माझ्या हस्ते झाले. जयंतीनिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.यावेळी एम गॅंग मंडळाचे अध्यक्ष निलेश सोनुले यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समानता आणि मानवतेचा संदेश संपूर्ण जगालाच दिलेला आहे. मग या जातीचा – त्या जातीचा, स्पृश्य-अस्पृश्य, श्रीमंत-गरीब हा भेद कशासाठी?

गोरगरीब जनतेचे सुरक्षा कवच माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणी माझा केसही वाकडा करू शकत नाही, असे सांगतानाच ते म्हणाले, गोरगरीब सामान्य, उपेक्षित, दीनदलितांच्या कल्याणाचे काम अव्याहतपणे यापुढेही सुरूच राहील.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, कागलसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पुरोगामित्वाची भूमी आहे. या भूमीत जातीयवादाची, धर्मांधतेची विषवल्ली कधीच रुजणार नाही.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात नगरसेवक सतीश घाडगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफसाहेबांनी गोरगरिबांच्या कल्याणाचे समाजकारण केले आहे. या सगळ्याचा काहीजणांना पोटशूळ उठलेला दिसतोय संकट कोणत्याही रूपाने येऊ देत, आम्ही जनता सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया, असेही ते म्हणाले.

यावेळी नगरसेवक सतीश घाडगे, नगरसेवक प्रवीण काळबर, संजय चितारी, सागर गुरव, ॲड. संग्राम गुरव, एम. गॅंगचे अध्यक्ष निलेश सोनुले, राहूल सोनटक्के, नितेश कांबळे, स्वप्नील सोनुले, तुषार लाड, राकेश सोनुले, चंद्रकांत कांबळे, तुषार हेगडे, निखिल शिंदे, शाहरुख पठाण, पप्पू श्रीवास्तव, यश देवकुळे, पप्पू लोखंडे, अर्जुन पाटील, करण पाटील, सागर सोनुले, जय देवकुळे आदी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *