बातमी

बेलेवाडी मासा पाझर तलावाचे पाणीपूजन लवकरच करणार

विविध विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ

सेनापती कापशी, दि. १७:
मासा बेलेवाडी ता. कागल येथे काम सुरू असलेल्या पाझर तलावाचे पाणीपूजन लवकरच करणार. तसेच येथील श्री. हनुमान देवालय पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येतील, इतके सुंदर मंदिर उभारू, असा निर्धार व्यक्त केला.

रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व झालेल्या कामांचे उद्घाटन झाले.

तीन कोटीहून अधिक विकासनिधी बेलेवाडीला देण्यात आला आहे. त्याबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांची गावातील प्रमुख मार्गावरून उघड्या जीपमधून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी घरासमोर गुढ्या उभ्या केल्या होत्या. सडा-रांगोळी रेखाटण्यात आली होती. ठिकठिकाणी माता- भगिनींनी औक्षण केले.

गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. येथील विकास कामांना प्राधान्य दिले असून, गावातील सर्व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत. शहीद जवान साताप्पा महादेव पाटील यांचे स्मारक आणि विशेष करून ज्योतिर्लिंग मंदिराच्या बाजूला होत असलेल्या तलावाचे काम पूर्ण करून लवकरच पाणी पूजनालाच आपण येणार आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने या गावातील असंख्य माहेरवाशिणी आल्या आहेत. माहेराच्या विकासाच्या अपेक्षा त्यांच्याही आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

गोकुळ दूध संघाचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य अमरीशसिंह घाटगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मंत्रिपदाच्या रूपाने जनतेच्या दारी विकासाची गंगा आलेली आहे. जनता आणि कार्यकर्त्यांनीही विकासकामे आता लाखात नको, कोटीमध्ये मागा, असेही ते म्हणाले.

मर्दासारखे समोरून लढा…….!
भाषणात गोकुळचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरीषसिंह घाटगे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे समरजित घाटगे यांना जाहीर आव्हान दिले. ते म्हणाले, मुश्रीफसाहेब, जनतेने दिलेल्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही अजूनही मतदार संघाचा विकास करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घ्या. अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते खंबीर आहोत. ज्याना लढायचे आहे, त्यांनी मर्दासारखे समोरून लढाई करा. जाती -पातीच्या कुबड्या तुम्हाला लागतातच कशाला……? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

स्वागत बाजीराव पाटील यांनी केले. यावेळी श्रीपती शिंत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवलिंग सन्ने, शशिकांत खोत, दत्तात्रय सदाशिव पाटील, मुकुंद बोडके, आप्पासो पाटील, जोती मुसळे आदी उपस्थित होते
……………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *