मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवाजी विद्यापीठांतर्गत, कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेला मुरगूडात शानदार प्रारंभ झाला. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने शिवराज हायस्कूलच्या व्हॉलीबॉल मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मुरगूडचे मंडलिक महाविद्यालय, एस. के. पाटील कॉलेज (कुरुंदवाड), डी. आर. माने कॉलेज (कागल) आणि देवचंद कॉलेज (अर्जुन नगर) हे संघ उपांत्य फेरीत पोहचले.
स्पर्धेचे उद्घाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासो थोरवत यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील, शिवराजचे प्राचार्य पी. डी. माने, प्रा. एस. एन. आंगज, डॉ. शिवाजी होडगे, माजी प्राचार्य महादेव कानकेकर, उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे ,
प्रा. सुहास वाघ, प्रा. किरण पाटील, संभाजी मांगले, उपप्राचार्य एल. व्ही. शर्मा, प्रा. आर. जी. पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील १६ वरिष्ठ महाविद्यालयाचे व्हॉलीबॉल संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून प्रथम येणारे चार संघ वडूज ( सातारा ) येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
राष्ट्रीय पंच महेश शेडबाळे, भालचंद्र आजरेकर, प्रवीण मोरबाळे, संजय पाटील, संग्राम तोडकर, दिपक चव्हाण, विनोद रणवरे, अनिल देवडकर यांनी काम पाहिले. मंडलिक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक व स्पर्धा सचिव प्रा. डॉ. शिवाजी पोवार यांनी स्वागत, स्पर्धेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी प्रास्ताविक तर प्रा. पी. आर. फराकटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महादेव कोळी यांनी आभार मानले.