बातमी

मुरगूडमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मेहता आय केअर अँन्ड लेजर सेंटर , लकी शेती सेवा केंद्र व एम .जे. अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चामध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार असून रुग्णानीं यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .

मुरगूड बाजारपेठेतील ” लकी शेती सेवा केंद्र येथे रविवार दि .२२ / १० / २०२३ रोजी सकाळी ११ते सायंकाळी ४वा .पर्यंत नेत्रतज्ञा मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे . अशी माहिती लकी सेवा केंद्राचे मालक हाजी बाळासाहेब मकानदार यानीं गहिनीनाथ समाचारशी बोलतानां दिली.

महात्मा जोतिबा फुले, जनआरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत बसणाऱ्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत . मोतीबिंदू निवड झालेल्या रुग्णानां त्याच दिवशी मेहता आय केअर सांगली येथे नेण्यात येणार असून ऑपरेशनसाठी येणाऱ्या पेशंटनां येण्या- जाण्याची , राहण्याची , जेवणाची सुविधा मोफत दिली जाणार आहे . या ऑपरेशननंतर लागणारे काळे गॉगलही मोफत देण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी हाजी बाळासाहेब मकानदार फोन नं .९४२३२७८०८६ व सर्जेराव भांडवले फोन नं .७७९८८६२१३५ यांच्याशी संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *