बातमी

मुरगूडच्या आत्मरुप गणेश मंदीरात गणेश जयंतीनिमित्य विविध कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील ” नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळ प्रणित श्री. गणेश जयंती व २८ व्या वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवार दि. १२ / २ / २४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर घेण्यात घेण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ वाजता अभिनेते मदन पलंगे यांचा खास महिला वर्गासाठी खेळ खेळूया मानाच्या पैठणीचा हा ” होम मिनीस्टर ” कार्यक्रम होणार आहे.

मंगळवार दि. १३ / २ / २४ रोजी सकाळी ८ वाजता श्रींची पालखी सोहळा, श्रींचा जन्मकाळ दुपारी १२ वाजता व रात्री ८ वाजता करंजीवणे येथील त्रिमुर्ती भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच बुधवार दि .१४ / २ / २४ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटानी होम हवन,  महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप दुपारी १२नंतर केले जाणार आहे.

सर्व भाविक भक्तानी सर्व कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाच्या  व विविध मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *