बातमी

शिवगड प्रतिष्ठान मुरगुड यांचे कडून शिवाजी मुरगूड नं.२ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्ट मुरगुड यांच्या वतीने शिवाजी विद्या मंदिर मुरगूड नं.२ शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
शाळेच्या कामकाजाकरीता लोखंडी तिजोरी व टेबल असे साहित्याचे स्वरूप आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छ.शाहु सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुहासिनीदेवी घाटगे(आईसाहेब) होत्या त्यांनी मनोगतात सांगितले की यापुढेदेखील शाळेच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याबाबत शिवगड प्रतिष्ठान प्रयत्नशील राहील.

शैक्षणिक साहित्य वाटपासाठी शिवगड प्रतिष्ठानचे सद्गुरु डॉ.श्रीकृष्ण देशमुख(काका)व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा स्नेहाताई महाजन यांचे सहकार्य लाभले यावेळी सचिव बाळकृष्ण चौगुले, सहसचिव नीलिमा लिमये,डॉ.पोंक्षे, खजिनदार बाळासाहेब सूर्यवंशी, मॅनेजर श्रीरंग पाटील,संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अमर चौगुले,शाळा समितीचे अध्यक्ष विजय मेंडके, उपाध्यक्षा रेणू सातवेकर, सदस्या मेघा डेळेकर, अश्विनी गुरव, सीमा उपलाने, अध्यापक अनिल बोटे, सविता धबधबे, गीता पाटील, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी आदी उपस्थित होते. स्वागत, प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रविण आंगज यांनी केले तर
सुत्रसंचालन मकरंद कोळी यांनी केले आभार अमर चौगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *