मुरगूड ( शशी दरेकर ) : पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणातील बदल व पावसाच्या कमी-जास्त प्रमाणामुळे पावसाळ्यातील साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मुरगूड शहरात डेंग्यू सदृश्य साथीची लक्षणे आढळल्याने पालिका व आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे .
शहराच्या कांही भागात डेंग्यू सदृश्य साथीची लागण झालेले रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीती पसरली आहे पालिका प्रशासनाने आज आरोग्य विभागाच्या मदतीने शहरात सर्व्हे सुरु केला आहे .
काही प्रभागातून पालिका सफाई कामगार व सामाजिक कार्यकर्त्यांना साठवणूक केलेले पाण्यात आळ्या आढळून आल्या. अशा पाण्याचा निचरा करून ताज्या पाण्यात औषध फवारणी केली.
डेंग्यू आजारापासून नागरिक बाधित होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने योग्य ते नियोजन करावे व जनजागृती करावी. त्याचबरोबर नागरिकांना त्वरित व अचूक रोग निदान करण्याकरता आजार नियंत्रण व उपाय योजनेच्या माध्यमातून जनजागृती करावी अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
पालिका प्रशासनाने डेंग्यू सदृश्य आढळणाऱ्या साथीची गांभीर्याने दखल घेत येथील आण्णा भाऊ साठे नगर (मातंग वसाहत ‘ ) येथे पाहणी करून व स्वच्छता मोहीम राबविली . तर आरोग्य विभागाच्या पथकाने घरोघरी सर्व्ह करून पाण्यात टाकावयाच्या औषध वापराचे आवाहन केले.