मुरगूड ( शशी दरेकर ) : शाळातून व ग्रंथालयातून जगण्याचे ज्ञान मिळते तर वृक्ष आपणास प्रत्यक्ष जगवत असतात. या वृक्षांप्रती आपण कृतज्ञतापूर्वक वर्तन केले पाहिजे, ते आपले पालनकर्ते आहेत. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले. ते शिवराज विद्यालय मुरगूडच्या पर्यावरण सेवा योजना व राष्ट्रीय हरित सेना यांच्यावतिने आयोजित महाराष्ट्र वृक्षदिना निमित्त वटवृक्ष पुजन कार्यकम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पी डी माने होते तर संस्था कार्यवाह आण्णासो थोरवत हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संस्था कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे हस्ते स्व.सदाशिवराव मंडलिक यांचे समाधी स्थळावरील वटवृक्षास पुष्पहार अर्पन करून पुजन करण्यात आले.
यावेळी पर्यवेक्षक एस एम कुडाळकर, कोजिमाशि संचालक अविनाश चौगले, विष्णूपंत मोरबाळे, सौ एस् जे कांबळे, सौ. जी एस डवरी यांचे सह पर्यावरण सेवा योजना व राष्ट्रीय हरित सेना विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.