बातमी

दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत – जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे

कोल्हापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शालांत पूर्व शिष्यवृत्ती, शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयांनी, पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी खालील मुदतीत अर्ज करावेत- 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती- विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे- दि. 30 सप्टेंबर पर्यंत, सदोष अर्ज व संस्था पडताळणी – 16 ऑक्टोबर पर्यंत

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती- विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे- दि. 31 ऑक्टोबर पर्यंत, सदोष अर्ज व संस्था पडताळणी – 15 नोव्हेंबर पर्यंत

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती- विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे- दि. 31 ऑक्टोबर पर्यंत, सदोष अर्ज व संस्था पडताळणी – 15 नोव्हेंबर पर्यंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *