मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ टी .एम .पाटील यांना दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय मजदूर युनियन यांच्या वतीने दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड2023 मिळाल्याबद्दल, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी मुरगुडचे कार्याध्यक्ष व मंडलिक यूवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार, कार्यवाह , अण्णासो थोरवत, प्रा. डॉ. शिवाजी होडगे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रशस्तीपत्र ,सन्मान चिन्ह आणि बोधचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतीय राष्ट्रीय मजदूर युनियन याच्या सिलिगुडी (पश्चिम बंगाल) येथे 11 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले यांच्या हस्ते, सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे.
उच्च शिक्षणातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, आंतरराष्ट्रीय संशोधन लेख, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व राज्यस्तरावरील शैक्षणिक योगदान, अशा निकषावर त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे .यासाठी मा. खासदार प्रा. संजय मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले. उपप्राचार्य ,प्रा .डॉ.टी. एम. पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.