बातमी

मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी ” श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. अनंत फर्नांडीस तर व्हा. चेअरमनपदी श्री. विनय पोतदार

मुरगूड( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील सुवर्णमहोत्सवी श्री , लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२२ते २०२७सालासाठी संस्थेच्या चेअरमनपदी श्री. अनंत बस्तू फर्नांडीस तर व्हा. चेअरमनपदी श्री. विनय शत्रुघ्न पोतदार यांची एकमताने निवड झाली. संस्थेच्या या निवडीप्रसंगी अध्यक्षपदी सहाय्यक निबंधकसो श्री. युसुफ अ. शेख हे होते .

यावेळी जेष्ठ संचालक श्री . जवाहर शहा , संचालक .सर्वश्री श्री . पुंडलीक नाना डाफळे , श्री . दत्तात्रय तांबट , श्री . चंद्रकांत माळवदे ( सर ), श्री . किशोर पोतदार , श्री . रविंद्र खराडे , श्री . रविंद्र सणगर , श्री . दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ . सुजाता प्रकाश सुतार, सौ . सुनिता सुशांत शिंदे , कार्यलक्षी संचालक श्री . नवनाथ डवरी , सचिव श्री . मारूती सणगर , मुख्य शाखा मुरगूड येथिल शाखाधिकारी सौ . मनिषा सुर्यवंशी , श्री राजेंद्र भोसले ( शाखा सेनापती कापशी ) , श्री . रामदास शिऊडकर ( शाखा कूर ) ,श्री अनिल सणगर ( शाखा सावर्डे बु॥ ) , के.डी. पाटील ( शाखा सरवडे ), अंतर्गत तपासणीस श्रीकांत खोपडे व सर्व सेवकवृंद उपस्थित होते. संस्थेचे नूतन चेअरमन व व्हा . चेअरमन यांचे निवडीबद्दल सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *