मुरगूड ( शशी दरेकर ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगुड येथील बिरदेव मंदिराच्या जिर्णोदरासाठी माझा हातभार लागतो हे माझ्या जीवनातील भाग्य समजतो. सध्या बिरदेव मंदिरासाठी एक कोटी व नंतरच्या टप्प्यात एक कोटी असा दोन कोटी चा निधी आणि
कळस बांधकाम करणेसाठी शासनाचा निधी नसल्यामुळे वैयक्तिक माझ्याकडून व समाजाकडून लागणारा निधी संकलित करून बिरदेव मंदीराचा तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकास करू असे प्रतिपादन पालकमंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी केले.
मुरगुड ता.कागल येथील बिरदेव मंदिर भेटी व पाहणी प्रसंगी नाम.मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील होते.जांभुळखोरा ते बिरदेव मंदिरा पर्यंत ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत सहवाद्य मिरवणुकीने नाम.मुश्रीफ यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सुवासिनीनी त्यांचे औक्षण केले.यावेळी या मंदिराच्या जिर्णोदरासाठी निधी मंजूर केल्याबद्दल नाम.मुश्रीफ यांचा धनगर समाजाचे वतीने सत्कार करण्यात आला.
स्वागत आप्पासो मेटकर यांनी तर प्रास्ताविक जगन्नाथ पुजारी यांनी केले यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे भाषण झाले. यावेळी युवा नेते दिग्विजय पाटील, सातापा मेटकर, आकाराम मेटकर, तुकाराम पुजारी,पांडुरंग पुजारी, प्रशांत मेटकर, महेश मेटकर, मारुती बोते, महादेव हजारे, संजय मेटकर, विठ्ठल मेटकर, साताप्पा पुजारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भगवान मेटकर तर आभार संदीप पुजारी यांनी मानले.