बातमी

मुरगूडमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबीरास उस्पूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) – मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मेहता आय केअर अँन्ड लेजर सेंटर, लकी शेती सेवा केंद्र व एम .जे. अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चामध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास उस्पूर्त प्रतिसाद मिळाला. या नेत्रशिबीरात १०५ रुग्णांच्या नेत्रतज्ञांच्या मार्फत तपासण्या करण्यात आल्या . त्यापैकी २० रुग्णानां मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सांगली येथिल मेहता आय केअर येथे नेण्यात आले . यावेळी मोफत नेत्रशिबीराचा अनेक रुग्णानीं लाभ घेतला.

या मोफत नेत्रशिबीराचे उदघाटन मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. किशोर विष्णूपंत पोतदार यांच्या हस्ते झाले . त्यावेळी पोतदार यानी लकी सेवा केंद्र व एम .जे. अँग्रो इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा बाळासाहेब मकानदार यांच्या विविध उपक्रमाबद्दल तोंडभरून कौतूक केले. श्री. गणेश नागरी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. उदयकुमार शहा, श्री .व्यापारी नागरी पतसंस्थेचे उपसभापती मा. श्री. प्रकाश सणगर यांच्या उपस्थितीत हा उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

मुरगूड बाजारपेठेतील ” लकी शेती सेवा केंद्र येथे रविवार दि. २२ / १० / २०२३ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वा पर्यंत घेतलेल्या मोफत नेत्रशिबीरास जावेद मकानदार ,एकनाथ पोतदार, प्रशांत शहा, साताप्पा पाटील, प्रदिप वेसणेकर, नामदेवराव पाटील, संदीप कांबळे, जयवंत हावळ, सुहास खराडे, पत्रकार भैरवनाथ डवरी , शशी दरेकर , अनिल मगदूम , श्री . व्यापारी नागरी पतसंस्थेचे कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.

शेवटी उपस्थितांचे आभार आयोजक व लकी सेवा केंद्राचे मालक हाजी बाळासाहेब मकानदार यानीं मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *