सर्वांनी ठरविले तर देशच काय तर आपण पूर्ण विश्व स्वच्छ करू शकतो – डॉ. सचिन परब

नशा मुक्त भारत अभियानाची सांगता

कागल / प्रतिनिधी : तरुण पिढी तंबाखू ,गुटखा, बिडी, सिगारेट ड्रग, दारू याबरोबरच मोबाईल यासारख्या व्यसनांच्या आहारी चालली आहे. केवळ तंबाखूमुळे देशात १३.५ लाख लोकांचा मृत्यू होतो . तर देशात १४ ते १८ वयोगटातील हजारो मुले दररोज व्यसनाधीन होत आहेत. परिणामी समाजात सामाजिक, आर्थिक, कायदे आणि आरोग्याबाबत समस्या निर्माण होत आहेत. वाढत जाणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समुपदेशन, प्रबोधन, औषधे, सात्विक आहार आणि राजयोग यामुळे कोणतेही व्यसन सुटू शकते. सर्वांनी ठरविले तर देशच काय तर आपण पूर्ण विश्व स्वच्छ करू शकतो.यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन मुंबई ब्रह्माकुमारी सेंटरचे डॉ. सचिन परब यांनी केले.

Advertisements

कागल येथील इंदुमती लाॅनवर आयोजित केलेल्या नशा मुक्त भारत अभियानाच्या सांगता समारंभात डॉ .परब बोलत होते. यावेळी सिव्हील सर्जन डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ संजयभाई (राजस्थान), पुण्याच्या क्षेत्रीय संचालिका सुनंदादीदी,पो.नि. गजेंद्र लोहार, बॉबी माने, रमेश माळी, संजय चितारी, अशोक जकाते, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisements

डॉ. परब पुढे म्हणाले भारत सरकारचा नशामुक्त भारत उपक्रम ब्रह्माकुमारीजने ९० दिवसात ३ लाख ९० हजार लोकांपर्यंत पोहोचविला आहे. नशा मुक्तीचे कार्य कठीण नाही नाही. मात्र त्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. विविध नशिल्या पदार्थांची मागणी कमी झाल्यास त्याचे उत्पादन कमी होईल. संगतीने व्यसनाधीनता वाढते त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे. ब्रह्मकुमारीज शाळा कॉलेजातील मुलांना व्यसनापासून वाचविणार आहे. असे असले तरी नशा मुक्तीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे त्यांनी सांगितले.

Advertisements

डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या आरोग्यासाठी गुटखा शंभर टक्के घातक आहे.अशी व्यक्ती एका वर्षातच कॅन्सरग्रस्त
होते. देशाचे भवितव्य असणारी तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यांना रोखणे आवश्यक आहे.
सुनंदा दीदी यांनी तणाव क्रोध अहंकार यांची राज योगामुळे मुक्ती मिळू शकते. व्यसनमुक्ती काळाची गरज आहे.
यावेळी संदीपभाई, संगीताबहेन,शोभादीदी डॉ. रश्मीबहेन, यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक तासगावच्या डॉ.वैशालीबेहेनजी यांनी केले. सूत्रसंचालन गायत्री बहनजी यांनी तर आभार राजश्री बहेनजी यांनी मानले. सुभाष भाई, सुनिताबहेन, सारिकाबहेन, शिल्पाबहेन, मनीषाबहेन, करवीर , पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, चंदगड, आजरा, शाहुवाडी, कागल, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा, इस्लामपूर, आदी सेंटरच्या रॅली सदस्य, कागल आणि परिसरातील भाई, बहनजी उपस्थित होत्या.


कागल….. फोटो
नशा मुक्त भारत अभियानाच्या सांगता समारंभात बोलताना डॉ.सचिन परब,व्यासपीठावर इतर मान्यवर.

1 thought on “सर्वांनी ठरविले तर देशच काय तर आपण पूर्ण विश्व स्वच्छ करू शकतो – डॉ. सचिन परब”

Leave a Comment

error: Content is protected !!