कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील शंभरहून अधिक मराठी भाषा शिक्षकांचा सहभाग
मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,
शिवाजी विद्यापीठ मराठी भाषा शिक्षक संघ,कोल्हापूर व येथाल श्री.दूधसाखर महाविद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए.भाग २ पेपर.क्रमांक .४ व ६ या अभ्यासपत्रिका शिकविणाऱ्या मराठी भाषा शिक्षकांचे प्रशिक्षण येथील दूधसाखर महाविद्यालयात उत्साहात पार पडले. शनिवारी २१ आक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या प्रशिक्षणात कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील विविध कॉलेज मधून शंभरहून अधिक मराठी भाषा शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या प्रशिक्षणातील उद्घाटन सत्र सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत झाले.स्वागत व प्रास्ताविक , दूधसाखर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. आनंद वारके यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.रणधीर शिंदे, यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी “कविता व कादंबरीचे अध्यापन”या विषयावर , शिवाजी विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा.डाॅ.नंदकुमार मोरे, यांचे बीजभाषण झाले. अध्यक्षस्थानी येथील दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.संजय पाटील हे होते.तसेच
श्री.एस.जी.किल्लेदारसो,सचिव,श्री.दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळ,बिद्री,प्रा.डाॅ.भरत जाधव,प्रा.डाॅ.प्रकाश दुकळे,सर्व सदस्य,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,शिवाजी विद्यापीठ मराठी भाषा शिक्षक संघ, कोल्हापूरचे सचिव व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. आभार प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी मानले.उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचलनासाठी मराठी भाषा विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील अभ्यासिका सुस्मिता खुटाळे यांनी केले.प्रशिक्षणाचे पहिले सत्र सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत झाले.या सत्रात पेपर क्रमांक ४ साठी नियुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण झाले.
“पक्ष्याचे लक्ष थवे,ना.धों.महानोर यांच्या निवडक कविता : अध्यापन व मूल्यमापन”या विषयावर प्रा.डाॅ.उदय जाधव यांनी तर “गीत लेखन:अध्यापन व मूल्यमापन”या विषयावर डाॅ.चंद्रकांत पोतदार यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.अनिल गवळी, प्रमुख,मराठी भाषा विभाग,यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, हलकर्णी यांनी तर सत्र संयोजक प्रा.डॉ.प्रियांका कुंभार यांनी काम पाहिले.
दुसऱ्या सत्रात : पेपर क्रमांक.६ साठी नियुक्त अभ्यासक्रमावर प्रशिक्षण झाले.या सत्रात
“‘बनगरवाडी’ : अध्यापन व मूल्यमापन” या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ सयाजीराजे मोकाशी यांनी तर “रिपोर्ताज संकल्पना : अध्यापन व मूल्यमापन”या विषयावर प्रा.डाॅ.शिवाजीराव जाधव, पत्रकारिता विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांनी प्रशिक्षण दिले.यावेळी सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.शिवाजीराव होडगे,प्रमुख,मराठी भाषा विभाग,सदाशिवराव मंडलिक महविद्यालय,मुरगूड हे उपस्थित होते.या सत्राचे सत्र संयोजक म्हणून प्रा.डाॅ.विजय शिंदे यांनी काम पाहिले.समारोप सत्रात प्रा.डाॅ.सुनिल चंदनशिवे, सदस्य,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली, उपस्थिती प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी भाषा शिक्षक संघ,कोल्हापूरचे सचिव प्रा.डाॅ.मांतेश हिरेमठ हे प्रमुख उपस्थित होते.प्रदीप कांबळे यांनी आभार मानले.
दरम्यान मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तिकेचे संपादक म्हणून प्राचार्य, डॉ.संजय पाटील यांनी,कार्यकारी संपादक म्हणून प्रा.डॉ.आनंद वारके यांनी व सहसंपादक म्हणून प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणास कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील विविध कॉलेजातून 100 हून अधिक मराठी विषयाचे शिक्षक तसेच प्रा.डॉ.एस. ए.साळोखे,डॉ.सी. वाय.जाधव ,अधीक्षक एस.के .पाटील, डॉ.नामदेव वारके,संजय गुरव,संग्राम भोईटे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.