मुरगूड येथे अंबाबाई मंदिरास भेट
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता कागल येथे अंबाबाई -मंदीराला भेट दिल्यानंतर बोलताना राजू शेट्टी म्हणाले कागल तालुक्यातील साखर कारखान्यांना त्यांच्याच अहवालातील हिशोबाप्रमाणे शेतकऱ्यांना चारशे रुपये जादा दर देण्यास काही हरकत नाही, माझे आंदोलन कुणा व्यक्तीवर अथवा कारखान्यासाठी नसून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी आहे, जोपर्यंत कारखानदार चारशे रुपये वाढीव दर देत नाहीत तोपर्यंत उसाचे एक कांडही तोडलं जाणार नाही .असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.
दर मिळाल्याशिवाय कोणीही मायबाप शेतकऱ्यांनी आपली तोड देऊ नये अशी कळकळीची विनंती त्यानी केली.
ते पुढे म्हणाले तुमच्या शेतामध्ये ऊसाची कांडी नाही तर ती सोन्याची कांडी आहे. त्यामुळे सोन्याचाच भाव घ्यायचा हे लक्षात ठेवा . ते पुढे म्हणाले कारखाना खाजगी असो वा सरकारी कागदोपत्री हिशोबात गोलमाल करुन कोल्हापूर , सांगलीतील ३७ कारखानदारानी गतवर्षी१२०० कोटीचा गोलमाल केला आहे .हवालातील हिशोबाचा लेखाजोखा मांडताना शेतकऱ्यांचेच कारखानदार नेते त्यांचा विश्वासघात करत असल्याचा घनाघात माजी खासदार राजू शेट्टी यानी यावेळी केला.
यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, दत्तात्रय साळुंखे, कागल तालुका संघटनेचे अध्यक्ष बाळासो पाटील, संदीप भारमल उपस्थित होते.
यानंतर शिवतीर्थ येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला . यावेळी मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी त्यांचे स्वागत केले .
यावेळी युवराज सूर्यवंशी ,विजय आढाव ,उदय भोसले ,सोमनाथ यरनाळकर ,सर्जेराव भाट , मयुर सावर्डेकर आदीसह शेतकरी वर्ग , नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते . त्या नंतर त्यांनी आदमापुर येथे पदयात्रेस जाण्यास सुरुवात केली .