मुरगूड ( शशी दरेकर ) – विद्यमान खासदारांनी पाच वर्षात काय दिवे लावले हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. तुम्ही वाट चुकलात तुमच्या चुकीच्या वाटेवर आम्ही तुम्हाला पुन्हा सहकार्य करावं अशी अपेक्षा का करता ? आता जनतेचे पाच लाखाचं ठरलंय.पाच लाखाच्या उच्चांकी मताधिक्याने शिव शाहू आंबेडकरांचा विचार दिल्लीच्या संसदेत जाणार आहे,”असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ मुरगूड येथे जाहीर सभेत ते बोलत होते . अध्यक्षस्थानी गणपतराव मांगोरे होते.
युवा नेते रोहित आर.आर.पाटील म्हणाले,” शाहू महाराज पाच लाखांनी विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.
कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
राजर्षी शाहूंच्या कृषी औद्योगिक गोरगरीब शेतकरी कल्याणाच्या उपकरातून उतराई होण्याची संधी कोल्हापूरच्या जनतेने स्वीकारली आहे.ज्याला मत दिले तो प्रामाणिक राहतो का हे तपासले पाहिजे.जे आपल्या पक्षाशी पक्ष प्रमुखाशी एकनिष्ठ राहिले नाहीत त्यांना नाकारण्याचा निर्धार लोकांनी केला आहे”.
छ शाहू महाराज म्हणाले,लोकशाही संपवण्याची प्रवृत्ती असणाऱ्या शक्तींना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे.संविधान वाचवण्यासाठी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येक निवडणुकीत कोणाला तरी मिठी मारून कोणाला तरी डोळा मारण्याचे काम विद्यमान खासदार करतात.या निवडणुकीत कोणाला मिठी मारून कोणाला डोळा मारणार असा प्रश्न अंबरीश घाटगे यांनी केला…
केंद्रीय शासकीय संस्थांचा गैरवापर करून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात किरीट सोमय्या खोट्या केसेस करत होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना घेवून अन्यायाच्या विरोधात मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबतीने बाबांचे कार्यकर्ते उभे राहिले त्यावेळी विद्यमान खासदार कोठे होते असा प्रश्न अंबरीश घाटगे यांनी केला.
कर्नाटकात गुजरातचा अमुल वाढवण्यासाठी नंदिनी दूध प्रकल्प संपवला.आता चौकश्या लावून ते गोकुळ संपवण्यासाठी प्रयत्न करतील.कोल्हापूरच्या गोकुळला हात लावला तर देश पेटून उठेल. शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवणारे हे सरकार उद्या गोकुळ बचावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवतील.असा घणाघात रोहित पाटील यांनी केला.
प्रमुख उपस्थिती दिनकराव जाधव, शिवानंद माळी, प्रकाश पाटील, दयानंद पाटील, धनाजी गौधडे, शिवाजी मगदुम, एकनाथ देशमुख, धनाजी सेनापतीकर, गजानन साळोखे, शशिकांत गोधडे, सुरेश गोधडे, विजय गोधडे, के. के-पाटील
ए. वाय, पाटील, जयसिंग टिकले, रणजील मुडुकशिवाले, विकास पाटील, रवींद्र कांबळे, बाबुराव शेवाळे आदी उपस्थित होते.
I like this website it’s a master piece! Glad I observed
this on google..