कागल (विक्रांत कोरे) : सोसायटी निवडणुकीच्या वादातून मागासवर्गीय समाजातील एकास जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याची फिर्याद कागल पोलिसात झाली आहे .सावर्डे बुद्रुक तालुका कागल येथील सोसायटीच्या निवडणूक वादातून हा प्रकार घडला आहे. कागलच्या सहाय्यक निबंधक कार्यालया जवळ ही घटना सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. आनंदा राजाराम पाटोळे वय वर्षे 52 राहणार सावर्डे बुद्रुक तालुका कागल, यांनी त्याच गावातील रघुनाथ दत्तात्रय शिरसे वय वर्षे साठ ,राहणार सावर्डे बुद्रुक, यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले चा गुन्हा नोंदविला आहे.
कागल पोलिसांतून मिळालेली माहिती असे की आनंदा पाटोळे यांना तीन अपत्ये आहेत.

या कारणाने त्यांनी भरलेला उमेदवारी अर्ज छाननीत काढणार आला .असे सहाय्यक निबंधक कागल कार्यालयातून त्यांना समजले. त्यानंतर ते चौकशीसाठी कागलच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात गेले. चौकशी करून ते बाहेर आल्यानंतर सिरसे यांची समोरासमोर भेट झाली. त्या वेळी माझा अर्ज छाननीत का काढला याचा जाब त्यानी विचारला असता ,पाटील यांनी त्यावेळी जातीवाचक शिवीगाळ करीत पाटोळे यांचा अपमान केला .म्हणून कागल पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे .पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.