बातमी

भडगांव येथे चुरशीने झालेल्या कब्बडी स्पर्धेत शिरोलीचा जयशिवराय क्रीडा मंडळ विजेता

मुरगूड (शशी दरेकर) : भडगांव ता. कागल येथेअत्यंत चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात जयशिराय क्रीडा मंडळ (शिरोली) संघाने मावळा सडोली संघावर दोन गुणांनी मात करूण मॅटवरील कब्बडी स्पर्धेत विजेता ठरला तर जय हिंद इचलकरंजी संघाने तृतीय क्रमांक पटकावला. 

  भडगाव ता. कागल येथे कोल्हापूर जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने हनुमान तरूण मंडळच्या वतीने कै. एच. एस. पाटील स्मृती चषक मॅटवरील दोन एकदिवसीय खुल्या गटातील कबड्डी स्पर्धेला प्राथमिक शाळेच्या क्रीडांणणावर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.

https://www.turtlemint.com/health-insurance/articles/importance-of-health-insurance-at-young-age/

   स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन अबिटकर दत्तामामा खराडे. राजेखान जमादार दिग्वीजय पाटील यांच्या हस्ते झाले.तर बक्षिस वितरण अॅड.वीरेंद्रसिंह मंडलिक गोकूळ संचालक अंबरिश घाटगे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा शितल फराकटे यांच्या प्रमुख उपस्थित झाले. स्पर्धेत उत्कृष्ट पकड सुरज पाटील (जय हनुमान भडगाव) उत्कृष्ट चढाई प्रसाद कुंभार(मावळा सडोली) अष्टपैलू खेळाडू दादासो पुजारी (शिरोली) या खेळाडूंना यांना बक्षिस देऊन गौरव करण्यात आले.

 पंच म्हणून डाॅ.सुरेश खराडे.अमर नावळे.के.बी.चौगले.संगीता फास्के, निकेश पाटील.मिलिंद ढोके.अवधुत परीट शिवाजी मगदूम यांनी काम पाहिले. यावेळी अमोल पाटील, दत्तात्रय सोनाळकर, सुनिल पाटील, ज्ञानदेव म्हांगोरे, दिलीप चौगले, डाॅ.अमोल बारवाडे, नितीन भांडवले, संदीप खतकर, मधुकर पाटील, प्रफुल पाटील, व्ही वाय खतकर, पी.आर. पाटील, उत्तम खतकर, कुंडलिक पाटील, तानाजी पाटील, रघुनाथ चव्हाण उपस्थित होते. निवेदन किरण पाटील यांनी केले.आभार हणमंत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *