बातमी

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कागलं तालुक्याच्या आत्मसम्मानाची व स्वाभिमानाची निवडणूक ! – पालकमंत्री ना. मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर ) – शक्तीशाली व सामर्थ्यवान भारतासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्याची गरज आहे . त्यामूळे सर्वांनी महायुतीच्या पाठीशी ठाम रहा. कोल्हापूर लोकसभेची निवडणूक वेगळ्या ऐतिहासिक वळणावरची आहेच . त्याशिवाय ही निवडणूक कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे . तालुक्याच्या अस्तित्वाची , स्वाभीमानाची व आत्मसन्मानाची निवडणूक आहे . त्याचे साक्षीदार व्हा असे आवाहन पालकमंत्री ना . हसन मुश्रीफ यांनी केले.

         महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुरगूडच्या ऐतिहासिक हुतात्मा तुकाराम चौकात जाहिर सभा झाली .सभेच्या अध्यक्षस्थानी  शामराव घाटगे होते . तर सभेस समरजितसिंह घाटगे , अभिनेता गोविंदा ‘ आमदार अमोल मेटकरी ‘ आमदार तानाजीराव मुटकूळे ‘ गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील , शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रविणसिंह पाटील ‘ अविनाश पाटील आदि प्रमुख उपस्थित होते.
 

            या सभेत बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले मोदीजींनी संविधान वाचविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसकडूनच संविधान मोडण्याचा व संविधानाचा अवमान  झाला आहे . देशाचे नागरिकत्व डावलणाऱ्या व महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करण्याची ही वेळ आहे.

            आमदार अमोल मेटकरी म्हणाले , जोपर्यंत सूर्य , चंद्र तारे आहेत तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही कोणीतरी भावनीक करुन मते मागातील त्यांना बळी पडू नका .

        महायुतीचे  उमेदवार संजय  मंडलिक भाषणात म्हणाले ‘ या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. देशाला स्थीर शासन दिले. आपल्याला देशाबरोबरच आपला जिल्हा बलशाली करायचा आहे. त्यासाठी छ. शाहूंचा कार्याचा व विचाराचा वारसा आम्ही घेवून या निवडणूकीत उतरलोय. भूमीपूत्राला विजयी करण्यासाठी आपण या सभेद्वारे निर्धार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

        अभिनेते गोविंदा यांनी हिंदी व मराठी भाषेत भाषण करीत उमेदवार संजय मंडलिक यांना साथ देण्याचे जनतेला नम्र आवाहन केले. त्यांनी समाजाच्या विकासासाठी महायुतीला दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले.

           या सभेत प्रविण सिंह पाटील, आमदार तानाजीराव मुटकूळे, रणजितसिंह पाटील, कॉं. अशोक चौगले , अॅड राणा प्रताप सासणे, बबन बाबर, संकेत भोसले, भगवान पाटील आदींची भाषणे झाली.

         सभेस शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, अॅड विरेंद्र मंडलिक बिद्रीचे संचालक सुनिल सुर्यवंशी , प्रवीण भोसले दिग्वीजय पाटील, आर.डी. पाटील, श्री खिलारे, रणजित सुर्यवंशी दगडू शेणवी आदि प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक शिवसेना जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनी केले तर संतोष वंडकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *