नोकरी

सहा. पोलीस निरीक्षक ” सुभाष पुजारी ” यांचा मुरगूडमध्ये सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मालदीव येथे घेण्यात आलेल्या ५४ वी मि. एशिया बॉडीबिल्डीर कॉम्पीटिशन २०२२ यामध्ये ८० किलो गटामध्ये मा .श्री . सुभाष पुजारी ( सहा . पोलिस निरीक्षक ) महामार्ग पनवेल पोलिस यानीं गोल्ड मेडल मिळवून महाराष्ट्र पोलिस दलासह भारत देशाचे नांव उंचावले आहे. असे गौरव उदगार माजी नगरसेवक मा. श्री. किरण गवाणकर यानी काढले . ते मालदीव येथे घेण्यात आलेल्या ५४ वी मि. एशिया स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून दिलेले सहा. पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते.

यावेळी एस .व्ही. चौगले (सर ) यानीं गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल शाल , श्रीफळ, गुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले . या सत्कार प्रसंगी श्री . किरण गवाणकर , श्री .एस.व्ही. चौगले (सर ) , श्री .शशी दरेकर, श्री .अमोल मेटकर , श्री . प्रविण भारमल , श्री . संदीप कांबळे , श्री .सर्जेराव साखळकर , श्री . सर्जेराव कुडवे , श्री . रणजीत वरपे, श्री . संदीप वरपे, श्री .. शिवाजी रेपे, श्री . मारुती हळदकर , श्री . अनिल मगदूम, श्री . प्रशांत हळदकर, श्री . रणजीत भारमल , श्री . अमर सणगर , दत्तात्रय कांबळे तसेच नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचे सर्व सभासद व मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *