बातमी

मुरगूडच्या व्यापारी नागरी सहकरी पतसंस्थेला बाबासाहेब पाटील यांची सदिच्छा भेट

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर बिद्री कारखान्याचे संचालक श्री. बाबासाहेब हिं. पाटील यानीं सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात सभापती श्री . किरण विठ्ठल गवाणकर व सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मी – नारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे नूतन सभापती श्री . किशोर विष्णूपंत पोतदार यांच्या निवडीबद्दल श्री. बाबासाहेब पाटील यानीं त्यांचा यथोचित सत्कार केला.

या सत्काराचे औचित्य साधून मा . पाटील साहेब म्हणाले व्यापारी नागरी व लक्ष्मीनारायण या पतसंस्था नावारूपास आल्या आहेत . त्या अत्तरोत्तर प्रगतीपथावर आहेत . या संस्थेनी सहकारी पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला आहे .सभासदांचे हित व कार्यसक्षम संचालकासह विनम्र सेववर्ग आणि काटकसर करुन पतसंस्था कशी चालवावी हे या संस्थेकडून इतर सहकारी संस्थानीं त्यांचा बोध घेतला पाहीजे . असे गौरव उदगार त्यानीं यावेळी काढले.

या प्रसंगी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे उपसभापती श्री . प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री साताप्पा पाटील , प्रशांत शहा , नामदेवराव पाटील, शशिकांत दरेकर , हाजी धोंडीराम मकानदार , प्रदिप वेसणेकर , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव ,कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर , कर्मचारी वर्ग उपस्थित होता. शेवटी उपस्थितांचे आभार संचालक नामदेवराव पाटील यानीं मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *