बातमी

मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री नामदार संजय बनसोडे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते लातूर येथे शानदार वितरण

मुरगुड ( शशी दरेकर ) : आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या इंडियन टॅलेंट सर्च या संस्थेमार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या नामांकित शाळेस प्रदान करण्यात आला. लातूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री ,नामदार संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना नामदार संजय बनसोडे म्हणाले शिक्षक व शाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री नाम.अजित पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करू. प्रसंगी शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासन दरबारी झटत असून याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा आशावाद शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.

शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई साहेब, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन मंजिरी मोरे देसाई, युवा नेते दौलतराव देसाई,शाळा समितीचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील को.जी.मा.शी.चे अध्यक्ष बाळ डेळेकर, आजी माजी विद्यार्थी , पालक,शिक्षक, कर्मचारी यांचे याकामी प्रोत्साहन लाभले. प्राचार्य एस. आर .पाटील, उपप्राचार्य एस.पी.पाटील,पी.एस.पाटील, प्रशांत डेळेकर, श्रीकृष्ण बोंडगे यांनी स्वीकारला.यावेळी दत्तात्रय मुद्देवाड, बालाजी सुवर्णकार, पंडित पांचाळ, बसवराज स्वामी, विजयकुमार राव जाधव ,लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष दिपाली आवटे, मदन धुमाळ ,आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *