24/09/2022
0 0
Read Time:1 Minute, 9 Second

आरटीपीसीआर रिपोर्ट व दोन डोस घेतले असल्यास महाराष्ट्रात प्रवेश

कागल(विक्रांत कोरे): ओमायक्रान याच्या साथीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांचे कागल चेक पोस्ट वरती तपासणी करून महाराष्ट्रात प्रवेश दिला जात आहे. पोलीस मुख्यालय व कागल पोलीस ठाणे, आरोग्य विभाग व महसूल विभाग येथील कर्मचारी व अधिकारी या तपासणी नाक्यावरती नियुक्त केले आहेत.

तपासणी दरम्यान प्रवाशांकडून दोन लसीचे डोस व आरटीपीसी चे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात येत आहे. ज्या प्रवाशांकडे यांचे प्रमाणपत्र नसेल त्यांना परत कर्नाटकमध्ये पाठवण्यात येत आहे. यामुळे चेकपोस्ट वरती वाहनांच्या रांगा लांबच -लांब लागत आहेत.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!