मुरगूड ( शशी दरेकर ) :
कौलगे, ता. कागल येथे संभाजी आनंदा पाटील यांच्या मुलाशी अल्पवयीन मुलीचा होणारा बाल विवाह रोखून ६ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ चे कलम ९ , १० , ११ प्रमाणे मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मुरगूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भुदरगड तालुक्यातील पाल पैकी देसाईवाडीतील अल्पवयीन मुलगी दिव्या रंगराव देसाई हिचा विवाह कौलगे ता. कागल येथील अक्षय संभाजी पाटील याच्याबरोबर आज दुपारी विवाह समारंभ चालू होता. याबाबत माहिती मिळताच मुरगूड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए आर वाघमारे यांनी आपला पोलिस फौजफाटा पाठवून देऊन हा बालविवाह रोखला.
याप्रकरणी ग्रामसेवक संतोष मारुती चौगुले यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद नोंदवली. मुलगीचे वडील रंगराव सोपान देसाई, आई सौ. संगीता रंगराव देसाई तसेच नवरा मुलगा अक्षय संभाजी पाटील, सासरे संभाजी अनंत पाटील आणि सासू सौ. भारती संभाजी पाटील आणि भटजी अक्षय अशोक गुरव या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ए. ए. पाटील करीत आहेत.