स्वर्गीय विजयमाला मंडलिक यांना हुतात्मा तुकाराम वाचनालयात अभिवादन !

मुरगूड ( शशी दरेकर ) : हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या संचालिका ,शिवराज विद्यालयाच्या अध्यक्ष शिक्षिका आणि कार्यकर्त्यांच्या माऊली स्वर्गीय विजयमाला सदाशिव मंडलिक यांचा आज ४३ वा  स्मृतिदिन येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयात संपन्न झाला.वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ रेखा भारमल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Advertisements

यावेळी  माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके,माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले , वाचनालयाचे सचिव व माजी नगरसेवक शिवाजीराव चौगले,माजी नगरसेवक व वाचनालयाचे संचालक किरण गवाणकर , माजी नगरसेवक मारुती कांबळे ,वाचनालचे संचालक अविनाश चौगले ,ॲड खाशाबा भोसले,प्राध्यापक महादेव सुतार ,प्राध्यापक महादेव सुतार,रमेश भोपळे , सर्जेराव कुंभार ,सागर हळदकर ,सुरेश दरेकर यांच्यासह वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप वरपे व  उत्तम बरकाळे , वाचकवर्ग उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!