बातमी

मुरगूड परिसरात थंड पेयांची मागणी वाढली

उष्मा वाढल्याने नदी, तलाव, विहीरीवर तरुणांची पोहण्यासाठी गर्दी

मुरगूड ( शशी दरेकर ) : अलिकडे मुरगूड , कागल परिसरासह जिल्हयात उष्मा वाढला आहे . दिवसभर अंगाची लाही ,लाही होत असून उष्म्याच्या तिव्रतेने नागरीक हैराण होत आहेत . त्यामुळे थंड पेयांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे .
यामध्ये प्रामुख्याने सरबत, ताक, ज्यूस, लस्सी आणि विविध कंपण्यांची थंडगार पेये यांची मागणी वाढली आहे.

सरबत, लेमन, लिंबू सोडा-सरबत विक्रीच्या गाडयावरही थंड पेयासाठी ग्राहक गर्दी करतानां दिसत आहेत. थंडगार कलिंगड खाण्यासाठी नागरिक आकर्षित होत आहेत. गावठी फ्रिज समजणाऱ्या कुभारांच्या मातीच्या घागरी व डेरे विक्रीचा धंदा तेजीत होतानां दिसत आहे.

असह्य उष्णतेमुळे बालचमुबरोबरच तरुण वर्ग, गारवा मिळवणेसाठी नदी घाट, विहीर, तलाव या ठिकाणी जाऊन पाण्यात पोहत मनसोक्त डुबण्याचा आनंद लुटत आहेत .
उन्हाळा अति तीव्र असलेने दुपारी बाजारपेठ व अनेक रस्त्यावर वर्दळ कमी प्रमाणात जाणवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *