मुरगूड (शशी दरेकर) : कागल विधानसभा मतदारसंघ हा संवेदनशील मनाचा आहे. येथील जनता सुज्ञच आहे. कागलच्या जनतेकडे हसन मुश्रीफ साहेबांच्या कामाची नोंद आहेच पण माताभगिनीकडे साहेबांच्या कामाची विशेष नोंद असल्यामुळे साहेब प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विजय होतात. सलग पाच वेळा आमदारकीमध्ये महिला वर्गाचा वाटा मोठा आहे असे प्रतिपादन महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा शीतलताई फराकटे यांनी केले.त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निढोरी व महिला सबलीकरण समिती निढोरी यांच्या संयुक्त विद्यमाने माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिता सावंत होत्या.
निढोरी ता.कागल येथे महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांचे वाटप, भैरवनाथ देवालयामध्ये महाआरती ,खास महिलांसाठी विशाल बेलवळेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमाचे स्वागत संतोष मोरबाळे यांनी केले तर प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते देवानंद पाटील यांनी केले.
आमदार हसन मुश्रीफ साहेब हा मातीशी नाळ जुळलेला नेता आहे. प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी व सर्वसामान्यांच्या विकासकामांसाठी देणारा लोकनेता आहे.अल्पसंख्याक समाजात जन्म घेतलेल्या हसन मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी हिंदुच्या मंदिरात महाआरती होते. असं भाग्य असणारा हा दुर्मिळ नेता आहे असं मत माजी लोकनियुक्त सरपंच देवानंद पाटील यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केले.
यावेळी काही नविन नियुक्त्या झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार झाले. महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नुतन जिल्हा अध्यक्षा शितलताई फराकटे, कोल्हापूर जिल्हा खरेदी विक्री संघाचे नुतन संचालक अमित पाटील, नुतन ग्रामपंचायत सदस्य राहुल सुतार, नुतन ग्रामपंचायत सदस्या सरिता मगदूम,उषा कांबळे व कुस्ती सुवर्णपदक विजेता रोहन रंडे यांचे सत्कार संपन्न झाले.तसेच सापडलेल्या सोन्याच्या अंगठ्या परत केल्याबद्दल मुरगूडचे सुरेश परीट व भाऊ परीट यांचेही कौतुक केले.
यावेळी संपन्न झालेल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रेखा पाटील,द्वितीय क्रमांक नयन सुतार,तृतीय क्रमांक शुभांगी कांबळे तर चतुर्थ क्रमांक सीमा जानवेकर हे स्पर्धक विजेते ठरले.या स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना,सहभागी स्पर्धकांना व सर्वच उपस्थितांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी माजी सरपंच जयश्री पाटील,सुशीला चौगले, सुविद्या चौगले,प्रेरणा चौगले, भारती रंडे, मालुताई मगदूम, सायली मोरबाळे,सरीता मगदूम, उषा कांबळे,विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सावंत यांनी केले.