बातमी

गोकुळ शिरगावमध्ये घरात घुसून मारहाण; सात जणांवर गुन्हा

गोकुळ शिरगाव : येथील सिद्धार्थनगरमध्ये राहत असलेल्या अंबिका सुनील पाटील यांच्या घरावर दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकून मारणे, घरात घुसून घरच्यांना लाथा बुक्क्याने मारहाण करने, घरासमोर असलेले इलेक्ट्रिक दुकानाच्या जाहिरातीचे बोर्ड फोडून नुकसान करणे, मोबाईलवर फोन करून सतत जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल शनिवारी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल झाला.

संशयित अक्षय संजय पाटील, सचिन प्रल्हाद घोडके, हर्षद सचिन घोडके, चेतन सचिन घोडके, संदीप विष्णू पाटील (सर्व रा. सिद्धार्थनगर गोकुळ शिरगाव), रोहित राजू दंडगल (रा. जागृतीनगर राजारामपुरी) व अक्षय सुधीर शनाय (रा. आर के नगर मोरेवाडी) अन्य अनोळखी पाच ते दहा इसम यांच्या विरोधात पाटील यांनी फिर्याद दिली.

One Reply to “गोकुळ शिरगावमध्ये घरात घुसून मारहाण; सात जणांवर गुन्हा

  1. गुंडगिरी समाजात वाढ झालेली आहे अस दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *