बातमी

समाजवादी प्रबोधिनीची मुरगूड मध्ये 34 वी व्याख्यानमाला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे दि 11 ते 14 अखेर आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीच्या मुरगूड शाखेच्या वतीने मंगळवार दिनांक 11 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 14 एप्रिल अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे 34 वे वर्ष आहे. व्याख्यानमाला विश्वनाथराव पाटील खुले नाट्यगृह हुतात्मा तुकाराम चौक येथे सायंकाळी 5:30 वा. होणार आहे.

मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.भालबा विभुते यांचे “महात्मा फुले विचार आणि सद्यस्थिती” या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत. बुधवार दिनांक 12 एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक डॉ. सुभाष देसाई “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म” या विषयाची मांडणी करणार आहेत. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार उपस्थित राहणार आहेत.

गुरुवार दिनांक 13 एप्रिल रोजी “सावित्रीबाई फुले व फातिमा बेग सामाजिक कार्य” या विषयाची मांडणी प्रा.डॉ.भारती पाटील करणार आहेत अध्यक्षस्थान मुरगूड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप घार्गे भूषविणार आहेत. मुरगुड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या शहरातील पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांचा सत्कार प्रबोधिनीच्या वतीने करण्यात येणार आहे.

व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार दिनांक 14 एप्रिल रोजी होणार आहे. समारोपाचे पुष्प गुंफण्यासाठी प्रबोधन प्रकाशन ज्योतीचे संपादक आणि समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजीचे सचिव प्रसाद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत “भारतीय स्वातंत्र्यलढा संविधान निर्मिती व सद्यस्थिती” या विषयावर ते भाष्य करणार असून अध्यक्षस्थान जेष्ठ अभियंता शाहू फर्नांडिस भुषवणार आहेत.

व्याख्यानमालेस माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, एडवोकेट सुधीर सावर्डेकर, बी.एस.खामकर,विद्यागौरी हावळ,उज्वला शिंदे,भिकाजी कांबळे,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शंकरदादा कांबळे, भीमराव कांबळे, कृष्णात कांबळे, सारिका पाटील, स्मिता कांबळे, विकास सावंत, सचिन सुतार, विक्रमसिंह पाटील, हरिश्चंद्र साळोखे, प्रदीप वर्णे, प्रांजल कामत, उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *