मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वाती शिंदेने कुस्ती क्षेत्रात परिश्रमपूर्वक यश मिळविले आहे . तीला नुकताच शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार मिळाला यासह अनेक पदके मिळविली यामूळे मुरगूडचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले याबद्दल मुरगूडकरांना अभिमान आहे. असे प्रतिपादन मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संदीप घागै यांनी केले.
येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलची आंतरराष्ट्रीय मल्ल स्वाती शिंदेला महाराष्ट्र शासनाकडून नुकताच शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहिर झाला त्याबद्दल स्वाती शिंदेचा मुरगूड नगरपालिकेच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याधिकारी श्री. घार्गे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वाती शिंदेचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्काराबद्दल नगरपालिके च्यावतीने पालिका कार्यालय अधिक्षका सौ. स्नेहल पाटील यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला . यावेळी मार्गदर्शक कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांचा मुख्याधिकारी संदीप घार्गे ‘यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मुरगूड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा . सुनिल डेळेकर ‘पिंपळे मॅडम ‘ अभियंता प्रकाश पोतदार खातेप्रमुख जयवंत गायकवाड , सचिन भोसले , कॉं.बबन बारदेस्कर भिकाजी कांबळे आदि प्रमुख उपस्थित होते .
पालिकेचे चिफ अकौंटट अनिकेत सुर्यवंशी ‘ रणजित निंबाळकर यांची अभिनंदनपर भाषणे झाली . स्वागत व प्रास्ताविक आरोग्य विभाग प्रमुख अमर कांबळे यांनी केले . कर निरीक्षक रमेश मुन्ने यांनी आभार मानले .