मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगूड शहरामधल्या महालक्ष्मी नगरातील पूर्व बाजूचा १५ मीटर रस्ता करावा अशी मागणी महालक्ष्मीनगर व मांगोरे , कॉलनीतील नागरीकांनी मुरगूड नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदना०दारे केली आहे.
निवेदन
या कॉलनीत वास्तव्यास असलेले सिकंदर जमादारसह अन्य आठ रहिवाशांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. मागणीच्या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर, सहायक संचालक, नगररचना कोल्हापूर, संचालक नगररचना महाराष्ट्र राज्य पुणे, उपसंचालक नगर रचना पुणे विभाग पुणे याना धाडल्या आहेत. संबधितांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना आधिनियम १९९६ च्या कलम ३७(१) नुसार मुरगूड शहराच्या मंजूर विकास योजनेत . रि .स .नं १९५ व २१२ मधून जाणारा विकास रस्ता १५ मीटर रुंदीच्या तरतूदीस गौण फेरफार प्रस्ताव नगरपालिकेने करून घेणे. दोन्ही कॉलनीसाठी अत्यंत गरजेचे आहे. दोन्ही बाजूनी अतिक्रमण झाले आहे. ये- जा करणे मुश्कीलीचे झाले आहे. मांगोरे कॉलनीत ये -जा करण्यासाठी तो एकच मार्ग आहे. याबाबत मुरगूड नगर परिषदेस या संदर्भात वारंवार लेखी व तोंडी सूचना देवूनही त्याबाबत त्यांचेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.
हा रस्ता १५ मी. रुंद लक्षात घेउन १९९१ मध्ये रि.स. नं. १९५,१९६,२०९,२१०,२१२ मधील रेखांकनास महालक्ष्मीनगर स. स. न. र. कोल्हापूर यांनी दोन फेब्रुवारी १९९१ रोजी मंजूरी दिलेली आहे. सदर रस्त्यास या मंजूर रेखांकन मधील भूखंड ३६ ३७,३८,३९,४०,४१,४२,४३, ४४,४५,५६ असे दहा भूखंड सन्मुख आहेत. तसेच मांगोर कॉलनीतील ३,४,५,६,७,८ भूखंड सन्मुख आहेत. सर्वच भूखंड धारकांनी नगरपालिकेकडून बांधकाम परवाने घेउन इमारत बांधकामे केलेली आहेत. या भूखंड धारकांनी इमारतीचे बांधकाम करत असतांना १५ मीटर रस्ता गृहीत धरूनच इमारत बांधकाम केले आहे.
परंतू अनेक मिळकत धारकांनी सदरच्या रस्त्यातच आपल्या इमारती बांधून अतीक्रमण केले आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी व आमच्या मालकीच्या इमारतीमध्ये ये- जा करण्याच्या दृष्टीने सदर आराखडयातील मंजूर रस्ता आहे, त्या रूंदीचा ताबडतोब करणे अत्यंत गरजेचे आहे. सदर रेखांकनातील (महालक्ष्मीनगर) मधील उत्तर दिक्षण दिशेतील ९ मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याच्या पूर्व पश्चिम दिशेतील १५ मीटर रस्ता डी. पी. रस्त्यास जोडले गेले आहेत. त्यामुळे सदर वसाहतीमधील नागरीकाना बाजार पेठेशी संपर्क साधण्याचा व निचरा होण्याच्या दृष्टिने रस्ता १५ मीटर रुंदीचा डी. पी. रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या मागणीचा पाठ पुरावा करून दोन्ही कॉलनीतील नागरीकांना न्याय मिळावा असेही निवेदनात म्हटले आहे.