बातमी

मुरगूडमध्ये मनोहर भिडेच्या प्रतिमेस जोडे मारे आंदोलन !

मुरगूड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या मनोहर भिडे यांचा मुरगूडमध्ये समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मोरे आंदोलन केले.

दलितमित्र प्रा.डी.डी. चौगले निषेध करताना म्हणाले मनुवादी प्रवृतीच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असणाऱ्या मनोहर भिडेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. शासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी.

समाजवादी प्रबोधिनी व इतर संघटनांच्या वतीने हुतात्मा तुकाराम चौकात मनोहर भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारुन प्रतिमा दहन करण्यात आले. एम .टी . सामंत, बी.एस. खामकर जयवंत हावळ यांची भिडेंचा निषेध करणारी भाषणे झाली.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके ‘ विलास भारमल ‘पी .व्ही . पाटील ‘ शाहू फर्नाडीस ‘ महादेव वाघवेकर ‘प्रदीप वर्णे ‘ सचिन सुतार ‘ सिकंदर जमादार , सुनिल कांबळे आदि प्रमुख कार्यकर्त्यासह शकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *