ताज्या घडामोडी

औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत’ व्यवस्थापन केंद्र पुरस्कृत योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर, दि. 3 : राज्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार केंद्र पुरस्कृत योजना ‘औषधी वनस्पतीचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन’ ही योजना राबविण्यात येते. ही योजना प्रकल्प आधारित असून संशोधन केंद्र, विद्यापीठे यांनी या योजनेअंतर्गत औषधी वनस्पतींच्या विविध घटकांचे प्रकल्प प्रस्ताव मार्गदर्शक सुचनेतील प्रपत्रानुसार सुचना राष्ट्रीय वनस्पती मंडळ (NMPB) नवी दिल्ली, यांना सादर करण्याकरिता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत पडताळणी करुन शिफारशीसह परिपूर्ण प्रस्ताव राज्य औषधी वनस्पती मंडळ (SMPB) पुणे यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत दर्जेदार लागवड साहित्य, IEC उपक्रम, काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभुत सुविधा, गुणवत्ता चाचणी आणि प्रमैंणन या घटकांचा समावेश होतो. या योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांमध्ये फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेज इन सप्लाय चेन ऑफ मेडीसिनल प्लांटस् (इंटिग्रेटेड कांम्पोनंट) (“Forward and backward linkage in supply chain of medicinal plants (Integrated component))” हा घटक नव्याने समाविष्ठ केला आहे. योजनेचा कालावधी २२ जून २०२३ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.

औषधी वनस्पतीचे संवर्धन विकास व शाश्वत व्यवस्थापन अंतर्गत विविध घटकांकरिता अनुदानासाठीची बाब, मापदंड व देय अनुदान याप्रमाणे-
दर्जेदार लागवड साहित्यासाठी पायाभुत सुविधा (लागवड साहित्याचे उत्पादन)

सार्वजनिक क्षेत्र-

  • १. बियाणे / जनुक केंद्राची स्थापना (४ हे.), मापदंड 25 लक्ष, देय अनुदान कमाल 25 लक्ष रुपये
  • २. आदर्श रोपवाटिका (४ हे.), मापदंड 25 लक्ष, देय अनुदान कमाल 25 लक्ष रुपये
  • ३. लहान रोपवाटिका (1 हे.) मापदंड 6.25 लक्ष, देय अनुदान कमाल 6.25 लक्ष रुपये

खाजगी क्षेत्र-

बियाणे जनुक केंद्राची स्थापना (४ हे.), मापदंड 25 लक्ष, देय अनुदान प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के कमाल रु. 12.50 लक्ष

आदर्श रोपवाटिका (४ हे.), मापदंड 25 लक्ष, देय अनुदान प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के कमाल रु. 12.50 लक्ष

लहान रोपवाटिका (1 हे.), मापदंड 6.25 लक्ष, देय अनुदान प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के कमाल रु. 3.125 लक्ष

माहिती, शिक्षण आणि संप्रेषण- शेतकऱ्यांचे प्रशिक्षण (किमान दोन दिवसांसाठी) 2 हजार रुपये, प्रती प्रशिक्षणार्थी राज्यातील व 5 हजार रुपये प्रती प्रशिक्षणार्थी राज्याबाहेरील प्रशिक्षणासाठी तसेच वाहन खर्च वरील अनुदानात देय राहिल.

खरेदीदार -विक्रेता भेट – जिल्हास्तरीय 1 लक्ष रुपये व राज्यस्तरीय 2 लक्ष रुपये

काढणीपश्चात व्यवस्थापन आणि विपणनासाठी पायाभुत सुविधा- वाळवणी गृह- 10 लक्ष रुपये, सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार 100 टक्के अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील आणि खासगी क्षेत्रातील अर्जदार 50 टक्के पात्र असतील.

मुल्यवर्धन पायाभुत सुविधा- सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार 100 टक्के अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील आणि खासगी क्षेत्रातील अर्जदार 50 टक्के अनुदान क्षेत्रासाठी पात्र असतील.

ग्रामीण संकलन केंद्र- सार्वजनिक क्षेत्रातील अर्जदार 100 टक्के अनुदान-सहाय्यासाठी पात्र असतील आणि खासगी क्षेत्रातील अर्जदार 50 टक्के अनुदान क्षेत्रासाठी पात्र असतील.

गुणवत्ता चाचणी – उत्पादकता चाचणी शुल्काच्या 50 टक्के जास्तीत-जास्त 5 हजार रुपये पर्यंत राहतील. (आयुष/ एनएबीएल मध्ये औषधी वनस्पती/ औषधी वनस्पतींची चाचणी घेतल्यास)

प्रमाणन – प्रमाणन शुल्क 5 लक्ष रुपयांच्या मर्यादेत गट/ क्लस्टर आधारित (गट/ क्लस्टर 50 हेक्टर लागवडीसाठी) योजनेच्या मार्गदर्शक सूचना राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली (NMPB) च्या https://nmpb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असेही श्री. दिवेकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *