बातमी

शिवगड ट्रस्टचा १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड-येथील शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट, या संस्थेचा दहावा वर्धापन दिन शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी राजे समरजीतसिंहजी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.

         दहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवचनकार.पू.डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा डॉक्टर काका यांच्यासंकल्पनेतून  आणि स्व.  विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या ट्रस्ट तर्फे अद्वैतत्वज्ञानाचा , संत वाङ्मयाचा प्रचार व प्रसार करणे यासह  आध्यात्मिक ज्ञानाची समाजाला ओळख करून देणे या उद्देशाने संस्था कार्य सुरु आहे.

     संत साहित्य, गीता, उपनिषदे आणि प्राचीन भारतीय वाड्:मयावर आधारित अभ्यास वर्ग घेतले जातात. अभ्यास वर्ग निवासी स्वरूपाचे असतात. अभ्यास वर्गामध्ये देश, विदेशातील संत साहित्याचे अभ्यासक सहभागी होतात.

       संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव केला जातो तसेच विशेष कामगिरी केलेल्या घटकांचाही गौरव केला जातो. अद्वैतत्वज्ञानाच्या कार्याकरिता ज्यांनी सेवा केलेली आहे अशा व्यक्तिमत्त्वांचा आध्यात्मिक कार्यगौरवपत्र देऊन सन्मान केला जातो. यावर्षी  हा मान ह. भ. प. श्री उदयकुमार घायाळ, (पुणे )प्राप्त झाला,

या निमित्त त्यांचा  सत्कार करण्यात आला. कौलव ता.राधानगरी येथील ह.भ. प. श्री. बळीराम पाटील यांचा सुद्धा विशेष  सत्कार करण्यात आला. कौलव पंचक्रोशी येथे ‘रवीविहार’ दत्तभक्त मंडळ स्थापन करून श्री दत्त मंदिराची स्थापना करून त्या मध्ये विविध आध्यात्मिक अभ्यास वर्गांचे आयोजन श्री पाटील करतात त्यांनी डॉ. काकांच्या प्रेरणेने कौलव पंचक्रोशी मध्ये शुद्ध अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार कार्यनिःस्पृहपणे सुरू ठेवलेले आहे.

        कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प.पू. मंदाताई गंधे अमरावती, श्री. प्रकाश शास्त्री मुळे अमरावती.श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे , सौ स्नेहा ताई महाजन हे उपस्थित होते. आभार श्री अशोकराव कौलवकर यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. विनय कुलकर्णी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *