मुरगूड ( शशी दरेकर ) : कोनवडे ता . भुदरगड येथिल प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांच्या ” थुई थुई आभाळ ” या बालकविता संग्रहाचा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी ( एमए ) अभ्यासक्रमात समाविष्ठ केला आहे.
विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाकडून एम ए भाग एकच्या वर्गासाठी सुधारित अभ्यासक्रम गठित केला असून अंतर्गत प्रथम सत्रासाठीच्या ” बालसाहित्य ” या अभ्यास पात्रिकेत क्रमिक पुस्तक म्हणून या कविता संग्रहाचा समावेश झाला.
कवी गोविंद पाटील यांचे गावकीर्तन, धुळधाण, उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत . त्यांच्या कवितानां अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मुलांच्यामधील कलागुण वाढीस लागावेत म्हणून प्राथमिक स्तरावर लेखन, विद्यार्थी साहित्य संमेलने, कार्यशाळा असे साहित्यीक उपक्रम त्यानी राबविले आहेत. सध्या गोविंद पाटील हे रायगड तालूक्यातील पनवेल येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.