व्हनाळी (वार्ताहर) : साके ता. कागल येथील कै. सौ. सुभद्रामाता आशिर्वाद माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेत प्रथम क्रमांक कु. प्राजक्ता धनाजी जाधव कु. प्रणव तनाजी पाटील (द्वितीय), पृथ्वीराज राजाराम पाटील (तृतीय) क्रमांक मिळवले.
शाळेने याही वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांना निवृत मुख्याध्यापक बी. डी. हाळदकर, प्रभारी मुख्याध्यापक व्ही. ए. ऱाऊत, शिक्षक पी. एच. पाटील, डी. एस. पाटील, टी. व्ही. पाटील, तानाजी सामंत, व्ही. टी. किल्लेदार, विश्वास जाधव, बाळासो पोवार, रमेश पाटील, अरूण पाटील शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रोत्सहान लाभले.