भर उन्हात दोन्ही गावातील हजारो लोकांचा ठिय्या
अतिरिक्त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे डी वाय एस पी आर आर पाटील हे दिवसभर मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये
मुरगुड (शशी दरेकर) : “क्रूरकर्मा आरोपीला फाशी द्यावी”, “खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा” अशा घोषणा देत सुमारे दोन हजार महिला पुरुष यांनी मुरगुड शहरात मोर्चा काढत तो पोलीस स्टेशन वर नेला. सोनाळी ता. कागल येथील वरद पाटील या सात वर्षीय बालकाचे अपहरण करून खून करणाऱ्या क्रूरकर्मा संशयित आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य ला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याने वरदचा नरबळी दिला आहे आणि पोलीस तपासासाठी खोटी माहिती देत आहे तरी तपास अन्यत्र भरकटत नेऊ नये. या मागण्यांसाठी सोनाळी सावर्डे बुद्रुक येथील सुमारे दोन हजार महिला-पुरुषांनी मुरगूड पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. भर उन्हात ग्रामस्थ पोलिस स्टेशन समोर ठिय्या मारून बसले होते.
पोलीस स्टेशन समोर इतक्या मोठ्या संख्येने जमाव जमल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होत. त्यामुळे अतिरिक्त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे व पोलिस उपाधीक्षक आर आर पाटील, सपोनि विकास बडवे आदी अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले पण त्या नराधमास फाशी झालीच पाहिजे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालू आहे या मागणीवर मोर्चेकरी आक्रमकपणे आपली म्हणणे मांडत होते. अधिकारी चार तास मोर्चेकऱ्याना विश्वास देत होते. तरीही आरोपीला फाशी झालीच पाहिजे या आशयाचे बॅनर घेऊन महिला आक्रमक बनल्या होत्या. इतका संख्येने जमाव घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता तरीहि पोलिसांनी आपला संयम ढळू दिला नाही. सुमारे चार तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर या दोन्ही गावचे लोक आपआपल्या गावी परतले.
नराधमाला कठोर शिक्षा झाली पाहिजे.