कोल्हापूर, दि. 21 : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाईन अर्ज भरलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामधील शिष्यवृत्तीच्या अर्जांचे 30 एप्रिल पर्यंत नुतनीकरण करावयाचे आहे. सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयातील प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याचा अर्ज भरला गेला आहे याची खात्री करावी तसेच त्यांच्या स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असेही श्री. लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.