जिल्ह्याच्या विकासाची विचारधारा… संजयबाबा घाटगे…
कर्तृत्वातून जनहितार्थ उदयास आलेले नेतृत्व संजय घाटगे….
संघर्षातही सामान्यांशी नाळ कायम….
संघर्ष आणि संजयबाबा अशा एकाच नाण्याच्या दोन बाजू घेवून सामान्यांसाठी सातत्याने झटत राहिल्यामुळे हरएक राजकिय परिस्थीत संजयबाबा घाटगे गट आजही गेली 35 वर्षे सातत्याने टिकून आहे. सामान्य गोरगरीब कार्यकर्ते,हिच या गटाची बलस्थाने आहेत. ज्या उद्धव ठाकरेंनी संजयबाबा घाटगेंना दोन वेळा उमेदवारी दिली त्या बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक असणा-या उद्धव ठाकरें सोबत कठीण काळात राहणे आपली जबाबदारी समजून संजयबाबा घाटगे त्यांच्या शिनसेनेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी धर्माप्रमाणे सध्या त्यांची राजकारणातील वाटचाल सुरू आहे. त्यामुळे अनेक अप्तस्वकियासह पराकोटीचा संघर्ष आणि राजकिय वादळातही कुठल्याही मोठ्या राजकिय सत्ता नसताना संजयबाबा घाटगे यांचा गट तालुक्यात सक्षम आहे.
तसं पाहिलं तर संजयबाबा घाटगे यांनी मनात आनल असतं तर ते क्रिकेटमधील नामवंत खेळाडू झाले असते. किंवा शहरामध्ये राहूण एैशअरामीचे जीवन जगू शकले असते. परंतू एैन उमेदिच्या काळात समाजातील दुखः ,दारिद्रय अधंश्रद्धा गरीबी ह्या त्यांनी अतिषय जवळून पाहिल्या ज्याचा त्यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला. आणि ते व्हनाळी सारख्या खेडेगावामध्ये राहायला आले. म्हणूच 1983 साली पंचायत समितीचे सभापती झाल्यानंतर कागल तालुक्यातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर काम स्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने गावा गावातील मागेल त्या शेतक-याला विहीर देण्याचे काम त्यांनी केले. सामान्यांना घरकुल योजनेतून कायमस्वरूपी निवा-याची सोय केली.
शिक्षक हा समाजाचा पायाभुत घटक संमजून आज तागायत त्यांना सन्मान दिला. त्या काळात गटातटाचा विचार न करता शिक्षक आणि त्यांच्या कुटूंबियांच्या सोयीसाठी शिक्षकानं 35 वर्षे एकाच गावात नोकरी केली हा बाबांच्या कार्याचा एक भाग आहे. तरूणांना व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी अंबरिषसिंह युथ फौडेशनमार्फत गावोगावी व्याख्याने ,व्यसनमुक्ती शिबीरे घेतल्यानेच आज कागल तालुक्यातील शेकडो युवक सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये दाखल होवून देशसेवा बजावत आहेत.
1998 -99 साली आमदार झाल्यावर आवघ्या 13 महिन्यांच्या कालावधीत कागल – मुरगूड बसस्थानक गावा-गावात घाट निर्मीती केली. दिंडेवाडी बारवे प्रकल्प त्यांच्याच काळात मंजूर झाला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की संजयबाबांना एक मंत्री पद द्या मला मंत्रीपद नको पण माझ्या तालुक्याच्या शाश्वत विकासाठी निधी द्या असे म्हणणारे संजयबाबा घाटगे हे एकमेव नेते असतील.
या सत्तेच्या काळात देखील संजयबाबांनी सर्व सामान्य व दिनदलीत याच्याशी असणारी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही. केनवडे-गोरंबे,साके-व्हनाळी,शेंडूर या गावातले शेतकरी सांगली-कव्हटेमहांकाळ अशा ठिकाणी ऊसतोडणीसाठी जात असत शेतीच्या जमिनीचा असणारा मालकच अशा पद्धतीने घुरा डोरांसारखा राबताना बघुन त्यांचे मन हेलावले आणि त्यांनी या चार गावांसाठी 5 हजार एकर कमांड एरिया असणारी श्री अन्नपुर्णा सहकारी पाणी पुरवठा संस्था उभी केली हि पश्चिम महाराष्ट्रीतील सर्वात मोठी आणि ह्या भागातील शेतक-यांची वरदाईनी ठरली आहे. आदर्श संस्था म्हणून अनेक शासनाचे पुरस्कार या संस्थेने मिळवलेले आहेत. या संस्थेने शेतक-यांचे पिढ्याण -पिढ्यांचे शास्वत कोटकल्याण केलेले आहे.
संजयबाबा घाटगे आणि सामान्य लोकांची नाळ इतकी घट्ट आहे की, आतापर्यंतच्या त्यांच्या राजकिय जीवनात बाबांचा पराभव हा ह्य़ा सामान्य लोकांनी कधीच केला नाही. परंतू या सामान्यांना भूलवून मोठे झालेल्यांनी तुमचाच आहे असं सांगत संजयबाबांचा विश्वासघात केला. परंतू त्यांना कधीही ते डगमगले नाहीत. परंतू या सगळ्यामध्ये जीवाभावाच्या कार्यकर्त्याचे प्रचंड राजकिय आणि आर्थिक नुकसान झाले. त्यांच्या राजकिय हाल अपेष्ठा बगवेनात म्हणून त्यांना कांही कटू राजकिय निर्णयही घ्यावे लागले . या सगळ्यात देखील संजयबाबा घाटगे हे एक विचार धारा असल्याने अनेक राजकिय वादळामध्ये त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांच्या बरोबरच भक्कमपणे उभे आहेत. कोणत्याही राजकिय सत्ता नसताना इतका मोठा गट ठिकवून तो सक्षमपणे कार्यरत ठेवल्याचे त्यांचे राजकिय विरोधक जाहिर सभेतून मान्य करतात. त्यांच्याकडे असणारी गोकुळ दुध संघाची सत्ता,यात सामान्य कार्यकर्त्यांच्या कष्ठाचे आणि संजयबाबांवरील प्रेमाचे प्रतिक आहे.
संजयबाबांच्या आयुष्यातील या संघर्षमय राजकिय जीवनातील आणखी एक पोहचपावती म्हणजे त्यांच्या उतार वयात या सामान्य, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साखर कारखाना उभा करण्यासाठी मोठे सहकार्य केले. जो कारखाना अतिशय नेटाने सुरू असून त्यासाठी माजी ग्रामविकासमंत्री आमदार हसन मुश्रीफ व पी.एन .पाटील साहेब यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आर्थीक सहकार्य केले. येत्या काळात तो नावाप्रमाणेच सामान्यांची अन्नपुर्णा बनून राहिल यात शंका नाही.
संजयबाबांच्या शास्वत समाजकार्यामुळे त्यांच्या पत्नी, सौ.अरूंधती घाटगे यांना गोकुळ संचालिका तसेच त्यांच्या सुनबाई सौ.सुयशा अंबरिषसिंह घाटगे यांना सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघात विक्रमी मताधिक्यानी विजय मिळवला. तसेच त्यांचे चिरंजीव अंबरिषसिंह घाटगे यांचा गोकुळ निवडणूकीतील अपराजित नैत्रदिपक विजय हा बाबांच्या कार्याचा एक भाग आहे. संजय घाटगे हे उच्चविद्या विभूषीत असून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एकमेव असे अजात शत्रू नेतृत्व असून सर्व पक्षीय त्यांचे सलोख्यांचे नातेसंबध आहेत. अशा शेतक-यांचे कैवारी असलेल्या नेत्यांना पुढे चांगले दिवस यावेत त्यांना दिर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे हिच सदिच्छा त्यांना 70 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
शब्दांकण ः सागर लोहार,साके
जनसंपर्क अधिकारी ः अन्नपुर्णा शुगर
I was examining some of your posts on this internet site and I conceive this site is rattling informative!
Keep posting..