व्हनाळी (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साके ता.कागल परिसरात विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्ात आली.
साके ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सैा.सुशिला पोवार , उपसरपंच निलेश निऊंगरे, बाळासाहेब तुरंबे, ग्रामसेवक संजय पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत निऊंगरे, सी.बी. कांबळे, मारुती निऊंगरे, बापुसो पाटील, साताप्पा पाटील, मोहन गिरी , रविंद्र जाधव, सुरेश आगळे, मारुती पाटील आदी उपस्थीत होते.
नालंदा बौद्ध विहार साके येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी सिद्धार्थ कांबळे, युवराज सूर्यवंशी ,अतुल कांबळे, रमेश कांबळे, सुरज कांबळे, गौतम कांबळे, डी .एस .कांबळे, कृष्णात शिलवंत ,उत्तम कांबळे प्रियांका अतुल कांबळे, अंकिता कांबळे,प्रसिका कांबळे, अर्चना कांबळे आदी बौद्ध बांधव उपस्थित होते. यावेळी माजी जि.प.सदस्य नानासाहेब कांबळे म्हणाले, डॅा.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. म्हणूनच आपण सर्व सुरक्षित असल्याचे त्यांनी मनोगतातून सांगितले.