बातमी

मुरगूड नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरिषदेच्या वतिने माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले असून मुरगूड नगरपरिषद, हद्दीतील सर्व गणेश भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संदीप घार्गे यांनी केले आहे.

ही नोंदणी दि.१८/०९/२०२३ पर्यंत आरोग्य विभागाकडे करावी लागणार असून पर्यावरण पुरक गणेशोत्सवात सहभागी होऊन नगरपरिषदेच्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीमध्ये सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन मुरगुड नगरपरिषदे मार्फत करण्यात आले.

बक्षिसे पुढील प्रमाणे : प्रथम क्रमांक – ५००० रु व सन्मानचिन्ह व्दितीय क्रमांक – ३००० रु व सन्मानचिन्ह , तृतीय क्रमांक – २००० रु व सन्मानचिन्ह, दोन उतेजनार्थ क्रमांक – प्रत्येकी १००० रु व सन्मानचिन्ह अशी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *