बातमी

श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेने ठेवीमध्ये २२ कोटीची भरघोस वाढ करून १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला – सभापती उदयकुमार शहा

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता. कागल येथिल श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १७ /९/२०२३ रोजी साई आखाडा हॉल येथे उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात सपन्न झाली. प्रथम अहवाल सालात संस्थेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक , देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान यानां श्रद्धांजली वाहणेत आली. नंतर संचालिका सौ. रेखा भोसले यानीं सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी बोलतानां सभापती उदयकुमार शहा म्हणाले ३१ मार्च २०२३या आर्थिक वर्षात ठेवीमध्ये २२ कोटीची भरघोस वाढ करुन १००कोटीचा ठेवीचा टप्पा पार करुन एक नवीन आदर्श घालून दिला आहे .. असे सांगत संस्थेचे सर्व सभासद , ठेवीदार यांचे आभार मानले . संचालक मंडळाच्या पारदर्शक कारभार व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्था प्रगतीपथावर आहे . संस्थेचा आढावा घेत ते म्हणाले वसुल भागभांडवल ३९ .९० , ८३० , गुतवणूक ३४ ,२६ ,०८, ४o९, खेळते भांडवल११५,०४, २८७, राखीव व इतर निधी ७ ,५८ ,८९ ,३८४ ‘कर्जे ७८,११,७२ ,६७६ एकूण व्यवहार ६८२ ,६३ ,६५,१७५ व निव्वळ नफा २,१७, २३, हजारावर विक्रमी नफा संस्थेस झाला आहे . अशाच प्रकारे संस्थेची उतरोत्तर प्रगती होत राहील अशी ग्वाही त्यानीं या वेळी दिली.

या सभेवेळी दहावी व बारावीमध्ये चांगल्या गुणानी उत्तीर्ण झालेल्या मुला -मुलींचा यथोचित सत्कार करुन बक्षिसे देणेत आली . कु. स्वाती शिंदे हिला महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेबद्दल तिचा व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविल्याबद्ल मान श्री. लवटे सर, मार्गदर्शक श्री. सुखदेव येरुडकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संस्थेने १०० कोटीचा टप्पा पार केलया बदल सभासदांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच खा. संजयदादा मंडलिक उत्कृष्ठ संसदपटू निवडीबद्दल, श्री. सदाशिवराव मंडलिक सह . साखर कारखाना निवडणूक विनविरोध केले बद्ल अभिनंदनाचे ठराव करण्यात आले.

यानंतर अहवाल वाचन संस्थेचे कार्यलक्षी संचालक श्री . राहुल शिंदे यानीं केले .सभासदानीं१ते १३विषयानां सर्वानुमते मंजुरी दिली. सभेवेळी जयशिंग भोसले, परशराम डोणे, मधुकर भोसले, आप्पासो कांबळे, विनायक हावळ, स्मिता -भिलवडीकर यानीं चर्चेत सहभाग घेतला. सभेस उपसभापती श्री . प्रकाश हावळ, संचालक सर्वश्री एकनाथ पोतदार, सोमनाथ यरनाळकर, सुखदेव येरुडकर , राजाराम कुडवे , आनंदराव देवळे, मारुती पाटील , दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ . दिपाली शहा , सौ . रेखा भोसले , कार्यलक्षी संचालक राहुल शिंदे , कर्मचारी वर्ग , सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे संचालक श्री. सोमनाथ यरनाळकर यांनी संस्थेच्या यशश्वी वाटचालीबद्दल सर्वाचे आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. साताप्पा चौगले यानीं केले तर आभार संचालक श्री .एकनाथ पोतदार यानीं मानले .

One Reply to “श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेने ठेवीमध्ये २२ कोटीची भरघोस वाढ करून १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केला – सभापती उदयकुमार शहा

  1. Wow, superb blog structure! How lengthy have you
    been running a blog for? you make blogging glance easy. The
    overall look of your web site is wonderful, as smartly as the content material!
    You can see similar here najlepszy sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *