केनवडे येथील ‘अन्नपुर्णा’ शुगरच्या गळीत हंगामाचा के. पी. पाटील, मंत्री मुश्रीफांच्या हस्ते शुभारंभ
व्हनाळी : राज्याच्या राजकारणात काहीही घडामोडी होवू देत गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारण कितीही मोठे बदल झाले तरी मी (मुश्रीफ) व संजयबाबा घाटगे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असा ठाम निर्धार राज्याचे वैद्यकिय शिक्षण व विशेष सह्याय मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या चतुर्थ गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे होते. माजी आमदार के.पी.पाटील, अरूणराव इंगवले, विजय देवणे,सुनिल शिंत्रे,सत्यजित जाधव गोकुळ संचालक अंबरिषसिंह घाटगे प्रमुख उपस्थीत होते.
नाम. मुश्रीफ म्हणाले, मागील 30 वर्षे सहा निवडणूका आम्ही जरी एकमेकांविरोधात लढलो असलो तरी आम्ही एकमेकांचे शत्रू कधीच नव्हतो. त्यामुळे येथून पुढे देखील आमच्यातील मैत्री कायम राहणार आहे. या गळीत हंगामाला यायला थोडा उशीर झाला असला तरी पुढच्या गळीत हंगामाला मी आगदी वेळेत येणार अशी ग्वाही देवून ते पुढे म्हणाले, यावर्षी हवामानातील बदलाने ऊसाचे उत्पादन घटणार हे खरे असले तरी संजयबाबा चे योग्य नियोजन चिकटी त्या जोरावर ते निर्धार केल्याप्रमाणे वर्षेभरात कारखान्याचे सुमारे 20 कोटींचे कर्ज फेडतील यावर माझा विश्वास आहे. येथून पुढेही मी अन्नपुर्णा च्या पाठीशी हिमालयासारखा उभा राहिन.
यावेळी अन्नपुर्णा शुगर कारखान्याचा चतुर्थ गळीत हंगाम शुभारंभ गव्हाण, मुळी पुजन माजी आमदार के. पी. पाटील यांचे हस्ते तर काटापुजन सत्यजित जाधव व महेश कोरी,अरूणराव इंगवले यांचे हस्ते झाले. सत्यनारायण पुजा संचालक सुभाष करंजे यांचे हस्ते सपत्नीक करण्यात आली.
संजयबाबा म्हणाले, ज्या सभासदांच्या जीवावर हा कारखाना उभारला त्यांना स्वासथ्य देणे हे आमचे कर्तव्य आहे. मंत्री हसन मुश्रीफ व अरूण इंगवले यांच्या सहकार्याने आम्ही नियोजन पुर्वक मार्गक्रमण करीत आहोत. यंदा गुळ पावडरला मागणी आणि मार्केटही चांगले आहे. त्यामुळे सभासदांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याला पाठवावा. त्या योग्य नियोजनातून वर्षेभरात सुमारो 20 कोटी इतके कर्ज फेडू शकू असा आम्हाला विश्वास आहे.
बिद्रीचे चेअरमन के.पी.पाटील म्हणाले, अतिशय प्रतीकुल परिस्थीतीत संजयबाबानी मोठ्या कष्टाने हा कारखाना उभा केला. अडचणींचा डोंगर फोडून या ठिकाणी तंत्रज्ञानाचा अविषकार घाटगेंनी केला आहे. हा कारखाना उत्तोरोतर अशीच प्रगती करीत राहिल यावर्षी कारखाना 1.30 मेगॅवॅट वीज निर्मिती करणार आहे. अशा सहप्रकल्पातूनच ऊसाला चांगला दर देता येतो. यावेळी सुनिल कांबळे, सुभाष पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सौ.अरूंधती घाटगे, धनराज घाटगे, नानासो कांबळे, सौ.सुयशा घाटगे, बाळासाहेब तुरंबे, विश्वास दिंडोर्ले, ए.वाय.पाटील, महेश देशपांडे, चिफ केमिष्ट सुनिल कोकीतकर, चिफ अकाऊंट शामराव चौगले, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी, कृष्णात कदम, रणजित मुडूकशिवाले, साताप्पा तांबेकर, आकाराम बचाटे, उत्तम वाडकर, बाजीराव पाटील, किरण पाटील, भैरू कोराणे,अशोक पाटील, तानाजी कांबळे, धोंडिराम एकशिंगे, सुरेश सोनगेकर, ज्ञानदेव पाटील, युवराज मेथे सर्व संचालक कार्यकर्ते, शेतकरी, सभासद उपस्थीत होते. स्वागत गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले. सुत्रसंचलन सुभाष पाटील तर आभार के.के.पाटील यांनी मानले.
जॅगरीच्या दरवाढीने शक्य….
गत वर्षी पेक्षा यंदा जॅगरी पावडरला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे 1 रूपायाही कर्ज आॅफ सिझनलमध्ये घ्यावे लागलेले नाही. तथापी कारखान्यामध्ये या वर्षी अनेक अद्यावत मशनरी बसवू शकलो. पॅावर पर्चेस अॅग्रीमेंट आमचा झाला असून यावर्षी सहवीज प्रकल्पातून 1.30 मेगॅावॅट वीज 4.75 पैसे दराने महावितरणला देणार आहोत.