बातमी

मुरगूडच्या श्री. गणेश नागरी पत संस्थेला २ कोटी ५० लाखावर नफा – चेअरमन सुखदेव येरुडकर

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पत संस्था मर्या. मुरगूड या अग्रगण्य समजल्या जाणा-या संस्थेला २०२३/२४ या आर्थिक वर्षात निव्वळ नफा रु.२ कोटी ५० लाख ५३ हजार रुपये इतका झाला असून या आर्थिक वर्षात एकूण व्यवहार हा रुपये ११२९ कोटी १३ लाख इतका झालेला आहे. तसेच संस्थेने ११६ कोटी ५३ लाख ठेवीचा टप्पा ओलांडला आहे . संस्थेने अल्पावधीतच गरुड भरारी घेऊन मुरगूड पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आर्दश निर्माण केलेला आहे.

  या पुढेही संस्थेची अशीच भरभराटी होईल अशी ग्वाही संस्थेचे चेअरमन श्री. सुखदेव येरुडकर यांनी दिली.

चेअरमन श्री. सुखदेव येरुडकर, संचालक श्री. उदयकुमार शहा व सर्व  संचालक यांनी  ११६ कोटी ५३ लाख ठेवीचे उद्दिष्ट पुर्ती केलेबद्दल, कार्यकारी संचालक श्री. राहुल शिंदे व सर्व सेवक वर्ग यांचे मनापासून कौतुक केले . व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत सेवकांनी केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सदर संस्थेला सन २०२२/२०२३ सालामध्ये दैनिक सकाळ पुरस्कृत आयडॉलस् ऑफ महाराष्ट्र, बॅण्डस् ऑफ कोल्हापूर या पुरस्काराने सन्मानित करणेत आले तसेच नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगाव यांचा महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्याचा आतरराज्य पुरस्काराने सन्मानित करणेत आले सदरचे मिळालेले पुरस्कार हे संस्थेने केलेल्या कामाची पोच पावती आहे.

स्वर्गीय खासदार श्री. सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने ही संस्था दि.३१/३/१९८९ इ.रोजी स्थापन झाली असून अवघ्या ३६ वर्षात या संस्थेचा वटवृक्ष होऊन लाखो लोकांचे जीवनमान सुधारणे साठी या संस्थेचा हातभार लागला आहे. तसेच खासदार श्री. संजयदादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस या संस्थेने प्रगती पथाकडे वाटचाल केली आहे.

संस्थेने चालु आर्थिक वर्षापासुन आधुनिकतेचे पाऊल पुढे टाकत असताना आपल्या ग्राहकानां कोअर बँकीग सेवा उपलब्ध करुन देत RTGS, NEFT, IMPS QR CODE या सारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे संस्थेने दिलेल्या सेवा व सोयीमुळे व संस्थेच्या सेवकांनी दिलेल्या विनम्र सेवेबद्दल सर्व स्तरावर कौतुक होत आहे. या प्रसंगी संस्थेचे व्हा चेअरमन मारुती पाटील , उदयकुमार शहा , एकनाथ पोतदार , आनंदराव देवळे , प्रकाश हावळ , सोमनाथ यरनाळकर, राजाराम कुडवे , आनंदा जालीमसर, दत्तात्रय कांबळे , संचालिका सौ . रुपाली शहा , सौ . रेखा भोसले , कार्यलक्षी संचालक श्री . राहुल शिंदे यांच्यासह सेवक वर्ग उपस्थित होता.

One Reply to “मुरगूडच्या श्री. गणेश नागरी पत संस्थेला २ कोटी ५० लाखावर नफा – चेअरमन सुखदेव येरुडकर

  1. I’ve been visiting this site for years, and it never fails to impress me with its fresh perspectives and wealth of knowledge. The attention to detail and commitment to quality is evident. This is a true asset for anyone seeking to learn and grow.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *