वारकऱ्यांनी सवलत प्रवेश प्रमाणपत्र जारी करुन घ्यावे – प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील
कोल्हापूर, दि. 20 : आषाढीवारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्यासाठी भाविक व वारकऱ्यांसाठी सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.

सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी हे सवलत प्रवेश प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर कर्यालयातून कार्यालयीन वेळेमध्ये सर्व वैध कागदपत्रे सादर करुन जारी करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी केले आहे.
Advertisements
