मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथील माजी प्राचार्य, दलितमित्र प्रा. एकनाथ देशमुख यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिटणीस पदावर नियुक्ती झाली आहे.
प्रा देशमुख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस च्या ओबीसी सेलचे राज्य उपाध्यक्षपद व मुख्य प्रवक्ता म्हणून काम केले आहे. बीसी सेलचे राज्य उपाध्यक्षपद तसेच अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष पद भूषविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९९९ पासून बीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पद भूषविले असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ते पारिचीत आहेत.
त्यांची ही निवड जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील , शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या शिफारशीमुळे व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहकार्यामुळे झाली आहे. या नियुक्ती नंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.